• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video : हार्दिक पांड्या सोबत रिलेशनशिपच्या चर्चा, अमीषा पटेल स्पष्टच म्हणाली…

September 11, 2026 by admin Leave a Comment


Ameesha Patel – Hardik Pandya : बॉलिवूड अभिनेत्री आमीषा पटेल हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताच चर्चांना उधाण आलं. व्हिडीओमध्ये आमीषा भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्यासोबत बेंगळुरूतील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या पार्टीत दिसली. व्हिडीओमध्ये अमीषा हिने हार्दिक याच्या खांद्यावर हात ठेवल्याचं दिसून आलं. अशात दोघांना एकत्र पाहिल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या. हार्दिक आणि अमीषा एकमेकांना डेट करत आहेत, अशा चर्चांना देखील उधाण आलं.. यावर आता खुद्द अमीषा हिने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमीषा हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

हार्दिक याच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा रंगलेल्या असताना अमीषा हिला मुंबईत स्पॉट करण्यात आलं. तेव्हा अभिनेत्रीला पापाराझींनी घेरलं. एका फोटोग्राफरने अभिनेत्रीला हार्दिक सोबत व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल विचारलं असता अमीषा विनोदी अंदाजात म्हणाली, ‘खूप जास्त व्हायरल झालं आहे… आता येथेच थांबवा…’, अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Bubble (@bollywoodbubble)

 

अखेर काय आहे प्रकरण?

सांगायचं झालं तर, अमीषा पटेल आणि हार्दिक पांड्या यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर एका युजरने पोस्ट केला. बेंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये आयोजित पार्टीत दोघे एकत्र दिसले. या पार्टीमध्ये, अमिषाचा हात हार्दिकच्या खांद्यावर होता. हा व्हिडिओ शेअर करताना एका युजरने लिहिलं, “पार्टीमध्ये अमिषा पटेलचा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर असलेला हात पाहता, रेडिटवर पसरलेल्या अफवा खऱ्या असल्याचं वाटतं. हा व्हिडिओ बेंगळुरू येथील पार्टीतील आहे.”

युजरच्या पोस्टवर कमेंट करत अमीषा पटेल म्हणाली, ‘तुम्ही बरोबर आहात… ज्या प्रकारे त्याच्या थांद्यावर हात होता, ते फार रोमँटिक होतं… मी तुला ओळखत नाही. पण नक्कीच सांगते की, तुझी कोणी मैत्रीण नसेल. ही पोस्ट करण्यापूर्वी तू एक मैत्रीण बनवली पाहिजे…’, पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Baramati | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
  • मिर्झापूर चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; त्या गाण्यावरून… भाजपमधील बड्या नेत्याचा आक्षेप
  • Amitabh Bachchan : 84 वर्षांचे झाले, तरी मनातली ती इच्छा अपूर्णच; अमिताभ बच्चन यांना कसली खंत ?
  • Tukaram Munde FDA: महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करताय? मग अशी काढा परवानगी, काय आहे प्रक्रिया?
  • OTT: शेवटपर्यंत वाढत जाईल थरार; क्लायमॅक्स पाहून उडेल थरकाप, 8 एपिसोड्सची सीरिज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in