• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Video: ‘जमिनीवर आपटेल..’ कुटुंबासाठी हेनरिक क्लासेन थेट भिडला, का आणि कशीसाठी?

May 1, 2026 by admin Leave a Comment

दक्षिण अफ्रिकेचा माजी विकेटकीपर फलंदाज हेनरिक क्लासेन सनरायझर्स हैदराबाद संघाचा मधल्या फळीचा कणा आहे. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेन मोर्चा सांभाळतो. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद संघ निश्चिंत असतो. तसं पाहिलं तर हेनरिक क्लासेन हा एकदम शांत स्वभावाचा आहे. सामन्यादरम्यान कधीच संतापलेल्या अवस्थेत पाहिलेलं नाही. त्याची आक्रमकता फक्त फलंदाजीत दिसून येते. फटकेबाजी करताना कोणतीच दयामाया दाखवत नाही. पण मैदानातील हेनरिक क्लासेन मैदानाबाहेर मात्र आक्रमक असतो. एक व्हायरल व्हिडीओतून ही बाब अधोरेखित झाली आहे. त्याच्या रागाचा फटका एका चाहत्याला बसला आहे. सनरायझर्स हैदराबादच्या चाहत्याचं वागणं हेनरिक क्लासेनला आवडलं नाही. त्याने लगेचच आक्रमक पवित्रा दाखवला आणि चाहत्याला खडे बोल सुनावले.

सोशल मीडियावरील व्हिडीओत क्लासेनचा आवाज असल्याचा दावा केला जात आहे. पण टीव्ही 9 या व्हिडीओची पुष्टी करत नाही. हा व्हिडीओ काढताना त्यााच चेहरा काही दिसत नाही, पण त्याचा आवाज असल्याचं बोललं जात आहे. हा व्हिडीओ कुठल्या हॉटेल किंवा एअरपोर्टचा असू शकतो. सनरायझर्स हैदराबादचा चाहता त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या परिवाराचे फोटो आणि व्हिडीओ काढत होता. त्या चाहत्याची कृती पाहून हेनरिक क्लासेन संतापला. त्याने चाहत्याला तिथेच खडे बोल सुनावले. यावेळी त्याने चाहत्याला व्हिडीओ रेकॉर्डिंग बंद करण्यास सांगितलं. क्लासेनने त्या चाहत्याला खडसावत सांगितलं की, कुटुंबासोबत आहे आणि यासाठी रेकॉर्डिंग बंद कर. ‘येथून जा आणि परत आला तर मी तुला जमिनीवर आपटीन. यासाठी परत जा.’, असं त्या व्हिडीओत रेकॉर्ड झालं आहे.

Heinrich Klaasen, SRH batsman got angry at a guy who was taking his photos along with his family in Hyderabad Mall.

Bro literally said “Will be on the floor, if I see you clicking my photo again” 😲

It’s pretty justifiable, In western countries or cultures to be precise they… pic.twitter.com/o8N71PkVy5

— Chota Don (@choga_don) May 1, 2026

कथित व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. काही चाहत्यांनी हेनरिक क्लासेनची बाजू धरली आहे. खेळाडूंच्या खासगी आयुष्याची सन्मान राखण्याचा सल्ला त्यांनी उतावळ्या चाहत्यांना दिला. आयपीएल स्पर्धेदरम्यान अनेक चाहते आवडत्या खेळाडूंसोबत फोटो घेण्यासाठी आतुर असतात. पण असं करताना अनेकदा मर्यादा ओलांडतात. यापूर्वी असे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी, टेंभापुरी धरणात बुडून तीन कामगारांचा मृत्यू
  • बजाज पल्सर NS400Z नव्या अवतारात, किंमत झाली कमी
  • सर्वाधिक विक्री झालेल्या CNG कारची यादी, अर्ध्या बाजारावर या कंपनीचा कब्जा
  • CSK vs MI Live Streaming : चेन्नई-मुंबई महामुकाबला, सामना किती वाजता?
  • मोठी बातमी! प्रतिभा चाकणकरांना दणका, खरात प्रकणात ईडीकडून समन्स; सखोल चौकशी होणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in