• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Tips : मूर्तीपासून आरशापर्यंत..घरात या वस्तूंच्या जोड्या नकोच, वास्तूशास्त्र काय सांगतं ?

September 11, 2026 by admin Leave a Comment


वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूची एक विशिष्ट ऊर्जा असते. त्यामुळे काही वस्तू एकाच प्रकारच्या दोन संख्येत घरात किंवा खोलीत ठेवणे अशुभ मानलं जातं. असं केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होऊन शांतता आणि सौहार्दावर परिणाम होऊ शकतो, अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार कोणत्या वस्तू दोन-दोन ठेवणे टाळावं ? जाणून घेऊया.

देवाच्या दोन मूर्ती किंवा फोटो ठेवू नका – घरातील देवघरात एकाच देवाच्या दोन वेगवेगळ्या मूर्ती किंवा फोटो ठेवणं टाळावं, असं वास्तुशास्त्रात सांगितले जातं. यामुळे घरातील ऊर्जेचे संतुलन बिघडू शकते, अशी मान्यता आहे. याशिवाय देवघरात दोन शिवलिंग, भगवान गणेशाच्या दोन मूर्ती किंवा दोन शाळिग्राम ठेवणंही टाळावं, असं म्हटलं जातं.

दोन झाडू एकत्र ठेवणं टाळा – घरात दोन झाडू एकाच ठिकाणी ठेवणंही टाळावं. वास्तुशास्त्रात झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो. त्यामुळे दोन झाडू एकत्र ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो, अशी मान्यता आहे.

एका खोलीत दोन आरसे ठेवणे टाळा – घरात आरसे एकमेकांसमोर ठेवू नयेत, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं. दोन आरसे समोरासमोर असल्यास घरातील ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी मान्यता आहे. याचा परिणाम घरातील वातावरणासोबतच तेथे राहणाऱ्या व्यक्तींवरही होऊ शकतो, असं वास्तुशास्त्रात मानलं जातं.

एकाच खोलीत दोन घड्याळं नकोत – एका खोलीत दोन घड्याळं ठेवणं वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही. विशेषतः दोन्ही घड्याळांमध्ये वेळेचा फरक असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, अशी मान्यता आहे. असं केल्याने घरातील व्यक्तींमध्ये मतभेद वाढू शकतात आणि महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.

दोन मुख्य दरवाजे समोरासमोर नकोत – घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व आहे. दोन मुख्य प्रवेशद्वारे एकमेकांसमोर असणं शुभ मानलं जात नाही. अशा रचनेमुळे घरातील आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो आणि पैशांची बचत किंवा संपत्ती वाढवण्यात अडचणी येऊ शकतात, अशी वास्तुशास्त्रीय मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही, याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs AFG: पहिल्या टी20 सामन्यात इशान किशन खेळणार का?; श्रेयस अय्यर म्हणाला…
  • आला रे आला… गणपती आला! संपूर्ण मुंबईला बाप्पाचे वेध, प्रतीक्षा शिगेला!
  • Dharashiv Ration Rice : रेशनच्या तांदळात चक्क दातांची कवळी; धाराशिवच्या रेशन दुकानात धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
  • Women’s Asia Cup 2026 final: जेतेपदासाठी भारत श्रीलंकेशी भिडणार; पाहा हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि कुठे पाहावा थेट सामना
  • माझ्याकडे चॅटिंगचे पुरावे, अभिनेत्रीने सूर्यकुमार यादवचं गुपित फोडलं; खुलासा आल्याने त्या चर्चेला फुलस्टॉप !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in