• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठताच चुकूनही पाहू नका या गोष्टी, संपूर्ण दिवस जाईल खराब

September 12, 2026 by admin Leave a Comment


हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये काही विशिष्ट वस्तू, झाडे, मूर्ती यांना शुभ माण्यात आलं आहे. तर काही विशिष्ट वस्तू, झाडे, मूर्ती यांना अशुभ माण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात अशा काही वस्तू असतात, त्या जर झोपेतून उठल्यानंतर लगेच तुमच्या दृष्टीस पडल्या तर तुमचा संपूर्ण दिवस खराब जाणार आहे, याचे ते संकेत असतात. त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर अशा गोष्टी पाहाणे शक्यतो टाळावे, या वस्तुंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. घरात जेव्हा नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. ज्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशा घरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यानंतर अशा गोष्टी पहाणे शक्यतो टाळावे, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे.

स्वत:ला आरशात बघणं टाळा – वास्तुशास्त्रानुसार सकाळी झोपेतून उठल्या-उठल्या लगेच आरशा समोर जाऊन उभा राहु नका, झोपेतून उठल्यानंतर लगेचच स्वत:ला आरशात बघणं टाळा. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही रात्री झोपता आणि सकाळी जेव्हा झोपेतून जागी होता, तेव्हा तुमच्या अंगामध्ये प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा भरलेली असते, अशा स्थितीमध्ये तुम्ही जेव्हा स्वत:ला आरशामध्ये पहाता तेव्हा ती ऊर्जा रिफेक्ट होते. त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

खरकटी भांडी पाहू नका – वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घरात कधीही रात्री जेवण झाल्यानंतर खरकटी भांडी तशीच ठेवू नयेत. ती स्वच्छ करून ठेवावीत. जर तुम्हाला रात्री जेवण झाल्यानंतर खरकटी भांडी तशीच स्वयंपाक घरात ठेवायची सवय असेल तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारची खरकटी भांडी झोपेतून उठल्यानंतर जर तुमच्या नजरेस पडली तर दिवसभर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं, तुमच्या मनाची चिडचिड होऊ शकते.

अस्त व्यस्त रूम – तुम्ही जिथे झोपता ती रूम नेहमी स्वच्छ असावी, म्हणजे तिथे फार पसारा नसावा, तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून उठता तेव्हा जर तुमच्या नजरेस हा राडा पडला तर तुमची चिडचिड होऊ शकते, तुमचा संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत सरकारची भूमिका काय, गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं
  • IND vs AFG: जसप्रीत बुमराह एका दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
  • लाकडी, धातूची की दगडी.. घराबाहेर कोणत्या मटेरियलची नेमप्लेट लावणं शुभ ?
  • Ishan Kishan Injury : ईशान किशन खेळणार की नाही? सस्पेंस संपला; श्रेयस अय्यरने दिली मोठी अपडेट
  • Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठताच चुकूनही पाहू नका या गोष्टी, संपूर्ण दिवस जाईल खराब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in