• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe: भंडारा- महाप्रसादाविषयी मोठा निर्णय, FDA ची परवानगी घ्यावी लागणार?  मार्गदर्शक सूचना जारी, नियम काय?

September 11, 2026 by admin Leave a Comment


सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचा मोर्चा आता महाप्रसाद आणि भंडारा वाटपाकडे मोर्चा वळवला आहे. यापूर्वीच अन्न आणि औषध प्रशासनाने सर्वधर्मीयांच्या सामूहिक अन्न वाटपासाठी स्थायी आदेश जारी केला आहे. सामूहिक अन्नवाटपाबाबत किमान सात दिवस आधी पूर्वसूचना देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय परवानगी देण्यात येणार नाही ,अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच दिली होती. आता विभागाने याविषयीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. काय आहे याविषयीचा नियम?

नियमामागील कारण तरी काय?

राज्यात होणारे महाप्रसाद, भंडारा, लंगर, इफ्तार पार्टी, अन्नछत्र आता एफडीएच्या रडारवर आले आहेत. तुकाराम मुंढे यांनी सण उत्सव अन्न सुरक्षा अंमलबजावणी स्थायी आदेश 2026 या नावाने नवीन आदेश जारी केला आहे. सर्व धर्माच्या सण उत्सवांसाठी हे आदेश लागू असतील. अन्न केंद्रे, खाद्यगृहे यावर FDA ची करडी नजर असेल. विनामूल्य अथवा नाममात्र दरात अन्नवाटप करणाऱ्यांवरही हा नियम लागू असेल. लग्नसमारंभासाठी सुद्धा हा नियम लागू असेल.

राज्यात होणारे सण, उत्सव, यात्रा, ऊरूस, इतर धार्मिक महोत्सवात अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी हे नवीन आदेश काढण्यात आले आहेत.  हे नियम त्रास देण्यासाठी नसून भाविकांच्या आरोग्याची काळजी आणि भेसळीमुळे होणाऱ्या घटना थांबवण्यासाठी असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.  एफडीए या आदेशांची चार टप्प्यात अंमलबजावणी करणार आहे. या कालावधीत एफडीए अधिकारी हे उत्पादन केंद्र, घाऊक व्यापारी, गोदामे यांची तपासणी करतील.

सण-उत्सवांची तीन श्रेणीत विभागणी

प्रथम श्रेणी- गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ, नववर्षाची सुरुवात आणि सरत्या वर्षाला निरोप देण्याचे कार्यक्रम

द्वितीय श्रेणी – मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी आणि कार्तिकी वारी, श्रावण मास, कृष्णजन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी, गुरूनानक यांची जयंती

तृतीय श्रेणी – स्थानिक यात्रा, जत्रा, पालखी सोहळे, ऊरूस आणि इतर धार्मिक कार्यक्रम

अंमलबजावणीसाठी कॅलेंडर

इतकेच नाही तर अन्न आणि औषध प्रशासन दर महिन्यात येणाऱ्या विविध सण, उत्सव, यात्रा आणि जत्रा, ऊरूस तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांविषयीची दिनदर्शिका तयार करणार आहे. यामध्ये कोणत्या अन्नपदार्थांचे वाटप करण्यात येत याविषयीचा आढावा घेण्यात येणार आहे. सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमाच्या ठिकाणी एफडीए अधिकारी स्वतः जाऊन तपासणी करतील. तर या कालावधीत अन्न परीक्षण प्रयोगशाळांनाही तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाहतेयस ना काजोल…; अजय देवगण-तब्बू यांच्यातील केमिस्ट्रीवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
  • भारताची ताकद वाढणार, पाकिस्तानचा थरकाप उडणार; पुतिन यांच्यासोबत कोणत्या शस्त्रासाठी डील होणार?
  • जरांगेंच्या उपोषणावर दीपकेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारला फरक पडणार नाही, आता…
  • चमत्कार की योगायोग? हनुमान मंदिराजवळ अचानक वानरांची गर्दी; उज्जैनमध्ये नेमकं काय घडलं?
  • नागपूरच्या ऐतिहासिक मारबत उत्सवाला सुरुवात, काळी पिवळी मारबत मिरवणुकीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in