• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे MPSC चे नवे बॉस व्हावे … रोहित पवार यांचा मोठा दावा

September 11, 2026 by admin Leave a Comment


Rohit Pawar On Tukaram Mundhe: राज्यात सध्या पेपरफुटी या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. MPSC स्पर्धा परीक्षेतील औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोर्चा काढला. या मोर्चात आमदार रोहित पवार आणि विरोधी पक्षातील नेतेही सहभागी झाले होते. या मोर्चात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एवढच नाही तर रोहित पवार यांनी एक मागणी धरली आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले, “MPSC आयोगाचे अध्यक्षच वादग्रस्त आहेत. त्यांनी अगोदरच्या विभागातही अनेक गोंधळ घातले आहेत. विवेक भीवनवार यांची कारकिर्दच वादग्रस्त ठरली आहे. अनेकांनी यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. अनेक पुरावे मुख्यमंत्री आणि राज्यपालांना दिले आहेत की या खात्यात  ते आयुक्त असताना सगळ्यात जास्त भ्रष्टाचार झाला आहे. अनेक वर्षांपासून भीमानवार हे RTOमध्ये कार्यरत होते, त्यांचे तिथले रॅकेट अजून इथे सुरु आहे. अजून 40 टक्के पुरावेच आम्ही सगळ्यांसमोर आणले आहेत. आम्ही लढणार आणि या माणसाचा राजीनामा झालाच पाहिजे.
तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष बनवा…
MPSC आयोगाच्या अध्यक्षपदावर तुकाराम मुंढे यांनी बसवा, मी सगळं चेक केले आहे, ज्या अटी आहेत त्यानुसार तुकाराम मुंढेसाहेब अध्यक्ष होऊ शकतात. भीमनवर यांच्या विरोधात जर कारवाई नाही झाली तर मुख्यमंत्री यांना पाठीशी घालत आहेत, ते मुख्यमंत्र्यांचे मित्र आहेत, असे देखील रोहित पवार म्हणाले.
“हे आंदोलन माझे नाहीये , जसं जमेल तसे विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थ्यांना विचारून ठरवू की आंदोलन करायचे आहे की नाही, जर विद्यार्थी म्हणाले तरच आंदोलन करु.. तुम्ही विरोधात असताना विद्यार्थ्यांसोबत होतात आणि आता सत्तेत गेला तर तुम्ही गप्प बसतात. तुमच्यात हिंमत नाही तुमचा बॉस चुकतोय तर त्याच्या विरोधात जायला. विद्यार्थ्यांचे कल्याण करा असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या उपोषणावर सरकारचं लक्ष, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी चर्चा करताना काय घडलं? मंत्री भुजबळांनी सगळं सांगितलं
  • भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक…
  • अखेर मनोज जरांगेंचं ठरलं, थेट मुंबईच गाठणार, उद्या सर्वात मोठी घोषणा; अंतरवलीत मोठ्या घडामोडी
  • मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध… बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
  • खिचडी खाल्यानंतर कुटुंबावर संकट, मुलावर काळाचा घाला, तर तिघांची मृत्यूशी झुंज, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलं काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in