• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Tukaram Munde FDA: महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करताय? मग अशी काढा परवानगी, काय आहे प्रक्रिया?

September 11, 2026 by admin Leave a Comment


गणेशोत्सव असो वा इतर धार्मिक कार्यक्रम, सण, उत्सव यामध्ये सामूहिक पंगत, महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करणार असाल तर FDA च्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे अन्न आणि औषध प्रशासन सणासुदीत करडी नजर ठेवून आहे. सर्वधर्मीयांच्या सामूहिक अन्न वाटपाविषयी धोरण ठरवण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. पण तुम्हाला महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करायेच असेल तर त्यासाठी कुठे परवानगी घ्यावी, काय प्रक्रिया करावी हे माहिती असणं गरजेचं आहे.

सात दिवस अगोदर घ्यावी लागेल परवानगी

महाप्रसाद, भंडारा, लंगर, इफ्तार पार्टी, अन्नछत्र आता एफडीएच्या रडारवर आले आहेत. तुकाराम मुंढे यांनी सण उत्सव अन्न सुरक्षा अंमलबजावणी स्थायी आदेश 2026 असा आदेश जारी केला आहे. सर्व धर्माच्या सण उत्सवांसाठी हे आदेश लागू आहेत. असा कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सात दिवस अगोदर अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानंतर सामूहिक अन्नवाटप कार्यक्रमाच्या ठिकाणी एफडीए अधिकारी स्वत: जाऊन तपासणी करतील आणि नमुन्यात काही गैर आढळल्यास नियमानुसार कारवाई होईल.

परवानगी कशी आणि कुठे मिळेल?

अन्न आणि औषध प्रशासनाच्या complaints.mahafda.in या अधिकृत पोर्टलवर जा

यावर सामूहिक अन्नवाटप पूर्वसूचना नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे

महाप्रसाद, भंडारा, लंगर, इफ्तार पार्टी, अन्नछत्र, सामूहिक पंगत आयोजित करण्यापूर्वी किमान 7 दिवस अगोदर हा अर्ज या पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे

परवानाधारक, नोंदणीकृत केटरर, स्वयंपाकघर अथवा संस्थांमार्फत सामूहिक अन्न तयार करून वितरीत
करत असतील तर त्यांना ही परवानगी घ्यावी लागेल

तर इथे करता येईल तक्रार

जर नागरिकांना अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत काही तक्रार असल्यास अथवा अन्नघटक तयार करताना अस्वच्छता दिसली, गुणवत्ता, दर्जा राखल्या गेला नसेल तर या गैरप्रकाराविरोधात नागरिकांना तक्रार करता येते. त्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क करता येईल. त्यांना complaints.mahafda.in यावर तक्रार करता येईल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Baramati | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
  • मिर्झापूर चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; त्या गाण्यावरून… भाजपमधील बड्या नेत्याचा आक्षेप
  • Amitabh Bachchan : 84 वर्षांचे झाले, तरी मनातली ती इच्छा अपूर्णच; अमिताभ बच्चन यांना कसली खंत ?
  • Tukaram Munde FDA: महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करताय? मग अशी काढा परवानगी, काय आहे प्रक्रिया?
  • OTT: शेवटपर्यंत वाढत जाईल थरार; क्लायमॅक्स पाहून उडेल थरकाप, 8 एपिसोड्सची सीरिज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in