
भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही धातूंना प्रचंड महत्त्व आहे. सणासुदीला तर अनेकजण सोने आनंदाने खरेदी करतात. पण आजकाल सोन्याचे भाव पाहून अनेकांना खरेदी करताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. पण आजचा सोन्याचे भाव चांगलेच घसरले आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. आज सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाली आहे.
आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 45 हजार 230 रुपयांवर पोहोचले आहेत. दुसरीकडे एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 28 हजार 660 रुपयांवर स्थिर आहेत.
गेल्या आठ दिवसात सोन्याच्या दरात साडे चार हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 14 हजारांची घसरण झाली आहे.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)




Leave a Reply