• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार

September 12, 2026 by admin Leave a Comment


भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी संजय गायकवाड यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. आपले शक्तिप्रदर्शन करण्याची आवश्यकता नसल्याचे महाले यांनी म्हटले.

आमदार महाले यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या कार्यक्रमांसाठी कोणताही पैसा खर्च करण्यात आलेला नाही. “जे काही घडले ते माझ्या मित्रांनी स्वेच्छेने केले आहे. आमच्या कुटुंबाने पाच पैशांचाही खर्च केलेला नाही,” असे त्यांनी नमूद केले. जनतेचे प्रेम आणि आशीर्वादामुळेच हे सर्व शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

संजय गायकवाड यांच्या “मी तुमच्या रॅलीला धाड नाक्यावरूनच परत पाठवले असते” या वक्तव्यावरही श्वेता महाले यांनी पलटवार केला. “ही हुकूमशाही, दडपशाही बुलढाण्यात चालणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. बुलढाणेकरांनीच सर्व नियोजन केले होते आणि ते अशा दडपशाहीला अजिबात भीक घालत नाहीत आणि भविष्यातही घालणार नाहीत, असे महाले यांनी म्हटले. हा जनतेच्या इच्छेचा विजय असून, बुलढाण्यातील जनता लोकशाही मूल्यांचे जतन करेल, असे त्यांचे म्हणणे आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Bigg Boss 20 : स्टार खूप, रॉकस्टार फक्त 1.. सलमान खानने कोणाचं केलं भरभरून कौतुक ?
  • आता फक्त DSP नाही, तर ‘कॅप्टन’! मोहम्मद सिराजकडे सोपवली कर्णधारपदाची धुरा
  • घरातल्या खिचडीने घेतला दुसऱ्या चिमुकलीचा बळी, संभाजीनगरातील त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर
  • BRICS Summit : ब्रिक्स शिखर परिषदेत तीन मोठे नेते एकत्र, जगाला नेमका संदेश काय?
  • जिनपिंग यांची रहस्यमयी कार काळ्या कव्हरने का झाकली? चीनला नेमकं काय लपवायचंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in