• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

R Madhavan: तुला अहंकारी बनावचं लागेल..; आर. माधवनने मुलाला का दिला असा सल्ला?

September 12, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवन सध्या त्याच्या दमदार स्विमिंग करिअरमुळे चर्चेत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणारा वेदांत आता 2026 आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी सज्ज झाला आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने भारतीय खेळाडूंची क्षमता, आहार आणि यशासाठी आवश्यक असलेल्या मानसिकतेबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. वेदांतच्या मते, भारतीयांमध्ये खेळासाठी आवश्यक असलेली नैसर्गिक क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. त्याने भारतीयांना ‘जेनेटिकली गिफ्टेड’ म्हणजेच नैसर्गिकदृष्ट्या प्रतिभावान असल्याचं म्हटलं. मात्र, ही क्षमता असूनही भारतीय खेळाडूंना अपेक्षित यश मिळवण्यात आहार हा एक महत्त्वाचा अडथळा ठरत असल्याचं त्याचं मत आहे.

विशेषतः भारतीयांच्या आहारात प्रोटीनचं प्रमाण वाढण्याची गरज असल्याचं वेदांतने सांगितलं. त्याच्या मते, जर खेळाडूंनी आपल्या आहाराकडे अधिक गांभीर्याने लक्ष दिलं आणि पुरेसं प्रोटीन घेतलं, तर भारताकडे क्रीडा क्षेत्रात आणखी मोठं यश मिळवण्याची क्षमता आहे. वेदांतने केवळ आहारावर भर दिलेला नाही. एका खेळाडूच्या प्रवासात माइंडसेट, शिस्त आणि स्वतःला सतत आव्हान देण्याची तयारी तितकीच महत्त्वाची असल्याचं त्याने सांगितलं. स्वतःच्या क्षमतेच्या मर्यादा ओलांडण्यासाठी त्याने आपल्या ट्रेनिंगमध्येही बदल केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

सध्या वेदांत 200 मीटर फ्रीस्टाइल प्रकारावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी त्याच्या ट्रेनिंगमध्ये वजन उचलण्याच्या व्यायामाचाही समावेश करण्यात आला आहे. याआधी तो प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या स्विमिंगसाठी ओळखला जात होता. आता नवीन प्रकारात स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो अधिक कठोर प्रशिक्षण घेत आहे.

वेदांत 2026 आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताच्या 12 सदस्यीय स्विमिंग टीममध्ये आहे. या संघात ऑलिम्पियन श्रीहरी नटराज आणि साजन प्रकाश यांचाही समावेश आहे. जपानमधील आइची-नागोया येथे होणाऱ्या या स्पर्धेत वेदांत 200 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सहभागी होणार आहे. वेदांतच्या यशामागे त्याच्या मेहनतीसोबत वडील आर. माधवनच्या पालकत्वाचीही चर्चा होते. माधवनने मुलाला लहानपणापासून स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची आणि स्वतःच्या ध्येयासाठी मेहनत करण्याची मोकळीक दिल्याचं यापूर्वी सांगितलं आहे. वेदांतच्या स्विमिंगसाठी कुटुंबानेही अनेक त्याग केले आहेत. त्याची ट्रेनिंग आणि डाएटची शिस्त अत्यंत कठोर असल्याचं माधवनने यापूर्वी सांगितलं होतं.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अन् ती गोष्ट घडताच महिलांना गावाबाहेर हाकलून देतात… असं काय घडतं ? अजब प्रथेने…
  • IND vs AFG : वैभव सूर्यवंशी OUT? भारताच्या माजी दिग्गजाने निवडली टॉप ऑर्डर; ‘या’ 3 खेळाडूंना संधी, कोण कोण?
  • ही सुंदर अभिनेत्री ट्रान्सजेंडर? प्रश्न उपस्थित होताच समोर येऊन सगळं सांगितलं; सर्वांनाच केलं गप्प!
  • जगावर आता मोठं संकट, कोरोनापेक्षाही खरतनाक आजाराचा प्रादुर्भाव, हजारो लोकांचा मृत्यू, WHO कडून हाय अलर्ट
  • Instagram चं latest फिचर, अपडेट होताच प्रोफाइल दिसेल आकर्षक, कसं वापरायचं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in