केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील रखडलेल्या १७ विधान परिषद जागांसाठी अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सध्या जागावाटप आणि उमेदवारांच्या निवडीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या राजकीय धामधुमीत विदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था […]
वयस्कर महिलांना पाहण्याची सवय..; ‘कान्स’मधील ऐश्वर्याच्या लूकची खिल्ली उडवणाऱ्यांना कंगना यांचं सडेतोड उत्तर
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जोपर्यंत रेड कार्पेटवर येत नाही, तोपर्यंत जगप्रसिद्ध ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ परिपूर्ण वाटत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. यावर्षीही चाहते ऐश्वर्याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर लेक आराध्या बच्चनसोबत ऐश्वर्या या अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात पोहोचली. यावेळी तिच्या लूकची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. काही नेटकरी ऐश्वर्याच्या निळ्या गाऊनमधील लूकचं कौतुक करत […]
NEET Paper Leak : ‘लीक पेपर’ ते ‘गॅरंटी सिलेक्शन’; NEET माफियाचा टेलिग्राम गेम अखेर उघड !
नीट-यूजी 2026 (NEET-UG 2026) पेपरफुटीप्रकरणामुळे देशभरात प्रचंड खळबळ माजली. या प्रककरणाचे धागेदोर थेट महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून आत्तापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. आता या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी वेगाने पावलं उचलली जात असून सीबीायकडून कसून तपास करण्यात येत आहे. याच खळबळजनक प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक बाब उघडझाली आहे. या घोटाळ्यासाठी टेलिग्रॅम ॲपचा वापर करण्यात […]
इराण आणि अमेरिका युद्धविराम करारात इस्त्रायलचा मिठाचा खडा, जगावर मोठं संकट..
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबवण्याच्या दिशेने पाऊल उचलली जात आहेत. वॉशिग्टन आणि तेहरान यांच्यात खिचडी शिजणे सुरू असतानाच इस्त्रायलनेही कान टवकारली आहेत. हेच नाही तर यादरम्यान इस्त्रायलकडून थेट चिंताही व्यक्त करण्यात आली. अणुकराराच्या मुद्द्यात अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेली जवळीकता इस्त्रायलकरिता एक चिंतेचा विषय बनली आहे. हेच नाही तर करारात काय गोष्टी नक्की ठरल्या […]
‘राजा शिवाजी’मधील जिजाऊंच्या भूमिकेबद्दल भाग्यश्रीने सोडलं मौन; म्हणाली ‘वयाने मोठी..’
अभिनेता रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची मोठी फौज पहायला मिळते. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री भाग्यश्रीसुद्धा ‘राजा शिवाजी’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. भाग्यश्रीने यामध्ये रितेश […]
Maharashtra News LIVE : अवघ्या 10 दिवसांत चौथ्यांदा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर
अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारातील सर्व मुद्द्यांवर तडजोड करण्यात आली आहे. लवकरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यात येईल, असं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. दोन्ही देशांमधील तीन महिन्यांहून अधिक काळ चाललेला संघर्ष त्यामुळे संपुष्टात येणार आहे. इराणने स्वत:कडील युरेनियमचा साठा नष्ट करण्याची हमी दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं […]