Akshay Kumar Next Film : अक्षय कुमारसाठी वर्ष 2025 ठीक-ठाक होतं. त्याचे चार चित्रपट रिलीज झालेले. 'स्कायफोर्स', 'हाउसफुल 5', 'जॉली एलएलबी 3' आणि 'केसरी चॅप्टर 2' या चित्रपटांच भरपूर कौतुक झालं. हे चारही चित्रपट फ्लॉप ठरले नाही. पण एकाही चित्रपटाने भरपूर कमाई सुद्धा केली नाही. आता अक्षय कुमार त्याच्या एका मोठ्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिथे […]
Russian Oil Tanker : वेनेजुएलाच्या समुद्रातील तेल टँकरवरुन रशियाचा अमेरिकेला अल्टीमेटम, पण भारतीयांचा जीव धोक्यात
अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश जागतिक राजकारणात परस्परांचे विरोधक आहेत. युक्रेन युद्धामुळे हा तणाव आणखी वाढलेला असताना आता एक तेल टँकर दोन्ही देशांमध्ये संघर्षाचं कारण ठरतोय. मागच्या आठवड्यात अमेरिकेने वेनेजुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना कैद केलं. त्यानंतर याच वेनेजुएलाच्या समुद्रात एक रशियन तेल टँकर अमेरिकेने ताब्यात घेतला आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या तेल टँकरसाठी आपली […]
Ambani : गडगंज संपत्ती… यश… अंबानी यांचा सक्सेस मंत्र दडलाय या 5 पुस्तकात; श्रीमंत होण्यासाठी जाणून घ्या नावं ?
रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. तसेच जगातील एक महत्त्वाचे उद्योजक आहेत. रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती 87 अब्ज डॉलर पेक्षाही अधिक आहे. असं असलं तरी मुकेश अंबानी अत्यंत साधं आयुष्य जगतात. रोज सकाळी 5 वाजता उठतात. साडे सात वाजेपर्यंत जीममध्ये वर्क आऊट करतात. विशेष म्हणजे त्यांना पुस्तके वाचण्याचीही आवड […]
मुस्तफिजुर रहमान याचे कमबॅक? BCCI नं खरंच दिली IPL 2026 मध्ये खेळण्याची ऑफर? मोठी अपडेट काय?
Mustafizur Rahman Comeback in IPL 2026: भारत आणि बांगलादेशात सत्तापालट नाट्यानंतर मोठा तणाव आहे. तर त्याचे पडसाद क्रिकेट जगतातही उमटले आहेत. BCCI ने बांगलादेशाचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला आयपीएल 2026 मध्ये खेळण्यास मंजूरी दिली नाही. कोलकत्ता नाईट रायडर्सने आयपीएल 2026 साठी लिलावात या बांगलादेशी खेळाडूला 9.2 कोटी रुपयात खरेदी केले होते. पण बांगलादेशात हिंदूवर […]
खेळणार की नाही? टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला धक्का, भक्कम फलंदाजाचं अचानक ऑपरेशन
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. भारतात स्पर्धा असल्याने गतविजेती टीम इंडिया प्रबळ दावेदार मानली जात आहे. यासाठी संघाची बांधणी करण्यात आली असून सर्वांच्या जबाबदारीही ठरल्या आहेत. असं असताना टीम इंडियाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. कारण मधल्या फळीत भक्कम बाजू सावरणारा फलंदाजाची अचानक सर्जरी करावी लागली आहे. हा फलंदाज दुसरा तिसरा कोणी […]
मतदानाला अवघे सहा दिवस बाकी असतानाच उद्धव ठाकरेंना मोठा झटका, बड्या नेत्यावर थेट ईडीची धाड; काय आहे प्रकरण ?
राज्यात सगळीकडे 29 महापालिकांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी महापालिकेवर आपलाच महापौर बसवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी उलट्यासुलट्या युत्या, आघाड्याही केल्या आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. काही राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. तर काहींनी शाखांना भेटी देण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. एकीकडे ही धामधूम […]