मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आज अभिनय, सूत्रसंचालन आणि उद्योजकता या तिन्ही क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असून तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड आणि कर्जतजवळ आलिशान फार्महाऊसही आहे. मात्र, अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे प्राजक्ताच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2004 […]
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तर घेणारच पण पंतप्रधान यांचा राजीनामा घेऊन हे आंदोलन थांबेल, असीम सरोदे यांचे विधान..
जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामध्येच घडामोडी घडताना दिसत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. यादरम्यान वकील असीम सरोदे यांनी पोलिस अत्याचार आणि आंदोलन यावर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी म्हटले की, मागे महात्मा गांधी आणि आंबेडकर यांचा फोटो ठेवला आहे. अभिजित दिपके पुण्यात आला, […]
PHOTO: नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच, दुतोंड्या मारुती पूर्ण बुडाला तर छोट्या-मोठ्या टपऱ्यांमध्ये पुराचं पाणी
नाशिकच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या पावसाने गोदाकाठावरील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आलं असून दुतोंड्या मारुतीच्या छातीच्यावर पुराचं पाणी पोहोचलं आहे. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. एवढंच नाही तर, उपमहापौर विलास शिंदे यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. सायंकाळपर्यंत 25 […]
CJP च्या दोन मागण्या मान्य, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय? काय म्हणालं सरकार?
NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात मोठी घडामोड समोर आली आहे. केंद्र सरकार आणि CJP (कॉक्रोच जनता पार्टी) यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर आंदोलनकर्त्यांच्या तीन प्रमुख मागण्यांपैकी दोन मागण्या सरकारने मान्य केल्याची माहिती CJPच्या प्रतिनिधींनी दिली आहे. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना CJPचे प्रतिनिधी […]
तडजोड नाहीच, CJP ने वाढवली सरकारची धडधड, प्रधानांच्या राजीनाम्याबाबत पत्रकार परिषदेत गरजला सौरभ दास, पोलिसांविरोधात कोर्टात जाणार?
CJP Spokesperson Saurabh Das: सोनम वांगचुक यांनी मध्यरात्री उपोषण सोडले. गेल्या 26 दिवसांपासून त्यांचे उपोषण सुरू होते. सरकारने एक उसासा टाकला. अर्धी लढाई जिंकली असली तरी सरकारची कॉक्रोच जनता पार्टीने धडधड वाढवली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा घ्या अशी मागणी CJP ने रेटली. पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी जंतर मंतरवर नुकतीच पत्रकार परिषद […]
NEET Paper Leak Update | पेपर फोडणाऱ्यांचं आता काय खरं नाही; दोषींना इतकी मोठी शिक्षा, सरकारचा मोठा निर्णय
NEET पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर आता कठोर कारवाईचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून पेपरफुटी रोखण्यासाठी आणण्यात येणाऱ्या सुधारणा विधेयकात दोषींना कठोर शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय दोषींवर 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूदही […]