टीम इंडियाच्या प्रशिक्षपदाची धुरा गौतम गंभीरच्या खांद्यावर आहे. त्याच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने अनेक चढउतार पाहिले. भारताची कसोटीतील स्थिती एकदम खालावल्याचं दिसून आलं. तर वनडे आणि टी20 फॉर्मेटमध्ये टीम इंडिया चांगली कामगिरी करत आहे. आता टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या दृष्टीने गौतम गंभीरची कसोटी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारतासाठी महत्त्वाची आहे. दक्षिण […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर; कोर्टात काय घडलं?
मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवताना सादर केलेल्या अहवालावर मुंबई हायकोर्टात याचिकाकर्त्यांनी आज आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही तर केंद्र सरकारला असून, राज्य सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडत घटनेचे उल्लंघन केल्याचा युक्तिवाद यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे. मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक […]
Dhurandhar: ‘धुरंधर’मधील रहमान डकैत, असलमचं नाव घेताच अख्खा पाकिस्तान घाबरायचा; क्रुर सैतानांची खरीखुरी कहाणी माहिती आहे का?
Dhurandhar Lyari Pakistan: भारतापासून पाकिस्तानपर्यंत, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपट धुरंधरने पुन्हा एकदा कराचीच्या ल्यारी भागाला चर्चेत आणले आहे. आदित्य धरच्या या स्पाय थ्रिलरमध्ये रणवीर सिंग, संजय दत्त आणि अक्षय खन्ना यांसारखे तारे आहेत. चित्रपटात पाकिस्तानच्या या कुप्रसिद्ध ल्यारी भागातील गँगवारची कथा पडद्यावर आणली आहे. चित्रपटात अक्षय खन्नाने रहमान डकैतची भूमिका साकारली आहे. तर संजय दत्तने […]
एकहीजण वाचला नाही, सर्वच्या सर्व 22 मजूर ठार, काहींच्या डेडबॉड्या सापडणंही मुश्किल… अख्खा ट्रकच डोंगरावरून कोसळला…
अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्यात गुरुवारी एक भयानक रस्ते अपघात घडला आहे. चकलागम येथे मजूरांनी भरलेला एक ट्रक पर्वतावरुन थेट दरीत कोसळला आहे. या ट्रकमध्ये एकूण २२ मजूर होते. त्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार यातील १९ मजूर हे आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील गिलापुकरी टी एस्टेटचे रहाणारे होते. सध्या घटनास्थळी बचाव पथकांद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालवण्यात आले आहे. […]
सर्दी खोकला झाल्यास लहान मुलांना वाफ देणे योग्य की अयोग्य?
थंडीचे वातावरण सुरू झाले आहे. सर्दी आणि खोकल्याचे हे ऋतू मुलांसाठी नेहमीच अडचणी घेऊन येतात. तापमान कमी होताच त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे वाहणारे नाक, खोकला, नाक चोंदणे, घसा खवखवणे आणि धाप लागणे यासारखी लक्षणे लवकर दिसून येतात. लहान मुलांमध्ये ही समस्या वाढते कारण ते आपली समस्या योग्यरित्या समजू शकत नाहीत किंवा समजावून सांगू […]
H-1B आणि H-4 व्हिसात काय फरक आहे ? अमेरिकेत जाऊ इच्छीणाऱ्यांनो आता हे काम करा…
अमेरिकेत काम किंवा अभ्यासासाठी जाणाऱ्या भारतीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने व्हिसाच्या नियमात बदल केले आहेत. त्यामुळे H-1B आणि H-4 व्हिसाच्या अर्जदारांना आता आपले सोशल मीडिया अकाऊंट सार्वजनिक करावे लागेल. या नियमांना लागू केल्यानंतर अनेक भारतीयांची नोकरी, शिक्षण, खाजगी प्रवास आणि फॅमिली प्लानवर संकट आले आहे. नव्या नियमांना 15 डिसेंबर 2025 […]