• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाचं पत्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अडचणी वाढल्या? पक्षात घडामोडींना वेग

August 3, 2026 by admin Leave a Comment


राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पत्र पाठवण्यात आलं आहे. 26 फेब्रुवारीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाच्या घटनेमधील 6,7, 12, 32 आणि 36 कलमांमधील बदलांना मान्यता देणारे पत्र निवडणूक अयोगाला प्राप्त झाले नाही, असा उल्लेख निवडणूक आयोगाच्या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे, आता आयोगाने या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध कागदपत्रे आणि प्रस्तावांची मागणी केली आहे.

हे एक पक्षाच्या तांत्रिक प्रक्रियेमधील पत्र आहे. निवडणूक आयोगाकडून 27 जुलै रोजी हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलं होतं. हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नावाने आलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीची कार्यकारिणी बोलावण्यत आली होती. या कार्यकारिणीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.  या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे जे कलम आहेत, पक्षाच्या घटनेतील 6,7, 12, 32 आणि 36 यामध्ये त्यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणीकडून बदल करण्यात आला आहे. मात्र पक्षाच्या घटनेतील बदलांबाबतची कागदपत्रे आणि प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पोहोचलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर हे पत्र पाठवण्यात आले आहे.

26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीची कार्यकारिणी बोलावण्यत आली होती. या कार्यकारिणीमध्ये पक्षाचे जे कलम आहेत, पक्षाच्या घटनेतील 6,7, 12, 32 आणि 36 यामध्ये त्यावेळी  बदल करण्यात आला होता. परंतु  पक्षाच्या घटनेतील बदलांबाबतची कागदपत्रे आणि प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पोहोचलेले नाहीत, त्यामुळे आता निवडणूक याोगाकडून या कागदपत्रांबाबत आणि प्रस्तावाबाबत पक्षाकडे विचारणा करण्यात आली आहे.  पक्षाच्या घटनेतील बदलाबाबतचे कागदपत्रंआणि प्रस्तावर सादर करा असं निवडणूक आयोगाने आपल्या या पत्रात म्हटलं आहे.

निवडणूक आयोग आणि पक्षांमध्ये अशा प्रकारचा पत्र व्यवहार सुरूच असतो, वेगवेगळ्या कारणांमुळे असा पत्रव्यवहार होतो. हा नियमित पत्रव्यवहाराचा भाग आहे, अशी प्रतिक्रिया या पत्रावर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान या निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत का? अशी चर्चा देखील आता सुरू झाली आहे.

 

 

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रेल्वेतून ब्लँकेट्स, चादरी चोरली? मग दंडासह इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास
  • कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई
  • अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही ट्रॅक्टरचे पुढचे टायर छोटे आणि मागचे टायर मोठे का असतात? कारण आहे खास
  • रक्षाबंधनाला बहिणीला कोणते खास गिफ्ट? Coin, Jewellery वा Digital Gold? हा पर्याय एकदम स्मार्ट
  • उन्हाळा असो वा पावसाळा; कारमध्ये ‘या’ गोष्टी विसरूनही ठेवू नका, होऊ शकते मोठे नुकसान

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in