• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Orry : चूक साराची अन् अडकला ओरी ! पार्टीतील ‘धक्काकांड’ वर मोठा खुलासा, नेमकं काय घडलं ?

September 11, 2026 by admin Leave a Comment


Orry On Sara Ali Khan : ओरहान अवत्रामानी, जो ‘ओरी’ नावानेच जास्त ओळखला जातो सध्या तो बराच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अभिनेत्री अमृता सिंगबद्दल वक्तव्य केलं होतं तर आता त्याने अभिनेत्री सारा अली खानशी निगडित एक किस्सा साधत पोलखोल केली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ओरीने एका पार्टीतला किस्सा सांगितला. सारने एका मुलीला खुर्चीवरून धक्का दिला आणि त्यानंतर सारा ऐवजी मी त्या घटनेची जबाबदारी घेतली, असं ओरीने मूद केलं. काही महिन्यांपासून ओरी आणि सारा यांच्या मैत्रीत वितुष्ट आलं असून तेव्हापासूनच तो तिच्यावर आणि तिच्या घरच्यांवर निशाणा साधताना दिसतोय.

साराने मुलीला खुर्चीवरून पाडलं

पिंकव्हिलाशी संवाद साधताना ओरीने ती ‘मज़ेदार’ कहाणी सांगितली आणि साराच ती व्यक्ती होती, जिने ही अशी गोष्ट रचली, असंही तो म्हणाला. ओरीच्या सांगण्यानुसार, पार्टीत असताना ते दोघे बसायला जागा शोधत होते. तेव्हा त्यांना एख खुर्चीवर एक मुलगी बसलेली दिसली. मग साराने त्या मुलीला खुर्चीवरून धक्का दिला आणि मग आम्ही दोघे त्या खुर्चीवर बसलो, असा किस्सा ओरीने सांगितला.

साराने ढकललं – पण जाब मला विचारला

त्या खुर्चीचा किस्सा सांगताना ओरी म्हणाला की , त्या मुलीने साराला काही प्रश्न विचारण्याऐवजी मलाच जाब विचारला. त्यावेळी सारा खूपच प्रसिद्ध होती, पण मी नव्हतो. त्यामुळे मी जी गोष्ट केलीच नाही, त्याचा सगळा ब्लेम मला माझ्यावर घ्यावा लागला, असं म्हणत ओरीने साराची पोलखोल केली.

नंतर मागितली माफी

आमचा एक कॉमन मित्र आमच्यातलं आणि त्या मुलीतलं भांडण मिटवायचा प्रयत्न केला, असं ओरीने पुढे नमूद केलं. जेव्हा ओरी त्या मुलीलाल भेटायला गेला तेव्हा तो एकदम ड्रॅमॅटिक अंदाजात तयार झाला होता, मात्र त्याचा तो अवतार पाहून मुलगी एवढी घाबरली, की तीच मागे हटली. आमचं नंतर बोलणं झालं आणि सगळ सॉर्ट आऊटही झालं, असं ओरी पुढे म्हणाला.

अमृता सिंह-सारा आणि पलक यांच्यासोबत वाद सुरू

जानेवारी 2026 मध्ये ओरीने इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती, जी नंतर डिलीट करण्यात आली. या रीलमध्ये त्याने सारा, अमृता सिंह आणि पलक तिवारी यांचा आपल्या ‘सर्वात वाईट तीन नावां’च्या यादीत समावेश केला होता. या पोस्टचा संबंध सामान्यतः सारा अली खान, पलक तिवारी आणि अमृता सिंह यांच्याशीच जोडला गेला. या वादानंतर सारा अली खान आणि तिचा भाऊ इब्राहिम अली खान यांनी ओरीला अनफॉलो केल्याचं समोर आलं. मात्र, नंतर ओरीने दावा केला की, त्याने या दोन्ही भावंडांना आधीच अनफॉलो केले होते.

ओरीने यापूर्वी 2021 मध्ये अमृता सिंह यांच्याशी संबंधित एका घटनेबद्दल खुलेपणाने भाष्य केलं होतं. त्याने त्या काळाला आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा असल्याचे सांगितले होते. तसेच, त्या घटनेमुळे आपल्याला अत्यंत वाईट परिस्थितीतून जावे लागले, असेही त्याने म्हटले होते. मात्र, ओरीने या घटनेचा नेमका तपशील सांगितला नव्हता. त्याने एवढेच म्हटले होते की, त्या अनुभवामुळे त्याला मोठा धक्का बसला; पण अखेरीस त्याच अनुभवाने त्याला अधिक मजबूत बनवले. ओरी आपल्या भूतकाळातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतो. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर सारा अली खानने बहुतांश वेळा मौन बाळगलंय

 

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रात्री 4 हत्या… सकाळी वडिलांना चहा पाजला, त्यानंतर… राहुलने नेमकं काय केलं?
  • 149 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये नागरिकांची गर्दी, एक ग्राहक तब्बल..
  • Elena Rybakina: वडिलांनी कार विकली, मुलीने देशाशी नातं तोडलं! आता एक सामना जिंकताच मिळणार 53 कोटी
  • EV मार्केटमध्ये ‘टाटा’चा धमाका! विकली जाणारी दर चौथी कार इलेक्ट्रिक, विक्रीचे आकडे पाहून सगळेच थक्क!
  • महाराष्ट्राची क्रश, शिवालीच्या नवीन लुकवर चाहते फिदा, हटके पोज पाहून सर्वच थक्क

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in