• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MPSCच्या सचिवांच्या तोंडाला काळं फासलं! नवी मुंबईत संभाजी ब्रिगेड आक्रमक; नेमकं काय घडलं?

September 11, 2026 by admin Leave a Comment


महाराष्ट्रात सध्या MPSC परीक्षार्थींचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. औषध निरीक्षक (Drug Inspector) परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणानंतर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अधिक तीव्र स्वरूप आले आहे. पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आपल्या मागण्या सरकार आणि MPSC प्रशासनासमोर मांडल्या आहेत.

दरम्यान, नवी मुंबईत MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून संभाजी ब्रिगेडने आक्रमक भूमिका घेतली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC कार्यालयात जाऊन सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे MPSC प्रशासन आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. MPSCचे अध्यक्ष आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या राजीनाम्याची मागणी परीक्षार्थींकडून केली जात आहे. पेपरफुटीचे प्रकरण त्यांच्या कार्यकाळात घडल्याचा दावा करत, या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच, पेपरफुटीमध्ये MPSCमध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

MPSCसारख्या महत्त्वाच्या परीक्षा घेणाऱ्या संस्थेत अशा प्रकारच्या व्यक्तींना स्थान नसावे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे. त्याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSCच्या नवी मुंबईतील कार्यालयात जाऊन केलेल्या या आंदोलनातून प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय पाठिंबाही मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात सहभागी होत त्यांच्या प्रश्नांना पाठिंबा दिला आहे. पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमिततेवरून विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न मार्गी लावण्याची मागणी त्यांनीही केली आहे.

नवी मुंबईतील या घटनेनंतर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणखी आक्रमक वळण मिळण्याची शक्यता असून, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, पेपरफुटी प्रकरणाची चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या मागण्यांकडे आता सरकार आणि MPSC प्रशासनाचे लक्ष लागले आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जरांगेंची गणपती उत्सवातच मुंबईत आंदोलनाची घोषणा; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया चर्चेत
  • Baramati | सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार vs पवार लढत होण्याची शक्यता
  • मिर्झापूर चित्रपट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; त्या गाण्यावरून… भाजपमधील बड्या नेत्याचा आक्षेप
  • Amitabh Bachchan : 84 वर्षांचे झाले, तरी मनातली ती इच्छा अपूर्णच; अमिताभ बच्चन यांना कसली खंत ?
  • Tukaram Munde FDA: महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करताय? मग अशी काढा परवानगी, काय आहे प्रक्रिया?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in