
ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर आले आहेत. आज नवी दिल्लीत ब्रिक्स परिषदेची औपचारिक सुरुवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात भारत मंडपम येथे भेट झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन राष्ट्रपती पुतिन यांना तामिळमधील गाजलेलं तिरुक्कुरल हे रशियन अनुवादित पुस्तक गिफ्ट म्हणून दिलं. तिरुक्कुरल हे तामिळ संत तिरुवल्लुवर यांचं पुस्तक आहे. पीएम मोदींनी पुतिन यांना हे पुस्तक भेट देताना त्याची माहिती दिली. दोन्ही देशांचे सांस्कृतिक संबंध वाढवण्यात या पुस्तकाची भूमिका राहील असं पीएम मोदी म्हणाले.
संत तिरुवल्लुवर यांनी या पुस्तकात मानवी जीवनाची अनेक वैशिष्ट्य सांगितली आहेत. पीएम मोदी यांनी हे पुस्तक भेट देताना पुतिन यांना त्याची माहिती दिली. रशियन भाषेत या पुस्कातचं ट्रान्सलेशन झालं आहे. जन संपर्क वाढवण्यासह, सांस्कृतिक संबंध भक्कम करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाचा फायदा होईल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
हे पुस्तक काय शिकवतं?
तिरुक्कुरल तामिळ साहित्यातील सर्वात महान आणि विश्व प्रसिद्ध रचनांपैकी एक आहे. याला तामिळ वेदही म्हटलं जातं. या पुस्तकाचं रशियनसह अनेक भाषांमध्ये भाषांतर झालं आहे. हे पुस्तक 2000 वर्षांपूर्व लिहिण्यात आलेलं. तिरुक्कुरल हे तिरुवल्लुवर यांनी लिहिलेलं क्लासिक तामिळ साहित्य आहे. तिरुक्कुरल तामिळ भाषेतील एक प्राचीन नैतिक साहित्य आहे. जीवन-मृत्यू यामध्ये जे अंतर आहे, त्यातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल वाचकांना हे पुस्तक शिकवते.
या पुस्तकाचं कोणी-कोणी कौतुक केलय?
तामिळ लोक तिरुवल्लुवर यांना प्राचीन संत, कवी आणि दार्शनिक म्हणून भरपूर सन्मान देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या अनेक भाषणात त्यांचा उल्लेख केला आहे. तिरुक्कुरल तामिळ साहित्याची ओळख आहे. तामिळनाडूच्या शाळांमध्ये या बद्दल शिकवलं जातं. प्रत्येक कुटुंबात याला सन्मानाचं स्थान आहे. महत्ना गांधी, लियो टॉल्स्टॉय सारख्या महान व्यक्तींनी या पुस्तकाची प्रशंसा केली आहे. कन्याकुमारीत तिरुवल्लुवर यांची विशाल मुर्ती हे याच सन्मानचं प्रतीक आहे. भारतीय साहित्यामध्ये रशियाला 17 व्या शतकापासून इंटरेस्ट आहे. युरोपियन भाषांमध्ये याचा अनुवाद झाल्यानंतर तिरुक्कुरलने रशियन विद्धावानांचं, साहित्यकारांचं लक्ष वेधून घेतलं.
Leave a Reply