
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 41 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. हैदराबादचा हा नववा तर मुंबईचा आठवा सामना असणार आहे. पॅट कमिन्स हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे पलटणच्या कर्णधारपदाची सूत्र आहेत. मुंबईला गेल्या 6 पैकी 5 सामन्यांत पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे मुंबईसमोर हैदराबादला पराभूत करुन कमबॅक करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे पलटणचा या सामन्यात चांगलाच कस लागणार आहे. मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना कधी?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना बुधवारी 29 एप्रिलला होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर स्मार्ट टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल. तर https://www.tv9hindi.com/sports/cricket-news या लिंकवर सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येतील.
रोहितचं कमबॅक होणार?
दरम्यान हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याचं कमबॅक होणार का? याकडे पलटणच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे. रोहितला 12 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यात हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. तेव्हापासून रोहित मुंबईच्या प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर आहे. अशात रोहित परतणार की चाहत्यांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.
Leave a Reply