
मुंबई इंडियन्सला गुरुवारी 23 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील आपल्या सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईला आपल्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सकडून सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला. या एका पराभवाने सर्व इतिहासच बदलून टाकला. (Photo Credit: PTI)
चेन्नई सुपर किंग्सने वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सवर 103 धावांनी विजय मिळवला. चेन्नईची यासह 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तसेच मुंबईची 100 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने सामना गमावण्याची पहिलीच वेळ ठरली. (Photo Credit: PTI)
संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा हिरो ठरला. संजूने नॉट आऊट 101 रन्स केल्या. संजू यासह सीएसकेकडून मुंबई विरुद्ध शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. (Photo Credit: PTI)
मुंबईचा डाव हा 104 धावांवर आटोपला. मुंबईची ही चेन्नई विरुद्धची सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. तसेच मुंबई वानखेडेत चेन्नई विरुद्ध पहिल्यांदाच ऑलआऊट झाली. (Photo Credit: PTI)
मुंबईचा 2026 या मोसमातील चेन्नई विरुद्धचा वानखेडे स्टेडियममधील सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला. मुंबईला सीएसकेआधी पंजाब आणि आरसीबीकडून पराभूत व्हावं लागलेलं. (Photo Credit: PTI)




Leave a Reply