
मराठा आंदोलन आता चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 14 वा दिवस आहे. उद्या मुंबईत जाण्यासाठीच्या मोर्च्याची घोषणा जरांगे पाटील करतील. पण त्यापूर्वी मोठी घडामोड घडली आहे.अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ईडीकडे भ्रष्ट्राचाराची तक्रार केली आहे. फडणवीस सरकारने जे SEBC आरक्षण दिलं ते आमच्यासारख्या असंख्य लोकांच्या प्रयत्नातून आणि कष्टातून मिळालेल होत. त्यावेळी जरंगेनी काय केल याचा साधा कुठेही उल्लेख नाही, असा दावा ही त्यांनी केला.
मनोज जरांगे यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार
मनोज जरांगे आणि त्यांचे जे काही सहकारी आहेत, ज्यांनी ३ वर्षापासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या नावाखाली भ्रष्टाचार आणि अस्थिरता सुरू आहे त्यावर मी बोलतोय. २००६ पासून मराठा आरक्षणासाठी मी काम करणार माणूस आहे. आम्ही समाजाला मराठा आरक्षण कस मिळेल यासाठी प्रयत्न करत होतो. या काळ्या धंद्याविरोधात मी अंमलबाजवणी संचालनालयाकडे, ED कडे अधिकृत तक्रार केलेली आहे. मनोज जरांगे यांचे काही सहकारी आहेत, ज्यामध्ये पांडुरंग तारक, किशोर बलांडे, गंगाधर काळकुटे, श्रीराम कुरणकर, संजय कटारे, स्वप्नील तार, बद्रिनाथ तारक आणि जरांगे यांचा मेव्हणा विलास खेडकर यांचा उल्लेख केला आहे. वाळू माफिया हा त्यांचा प्रमुख उद्योग आहे.
मनोज जरांगे यांच्या जीवाला धोका नाही
मनोज जरांगे हे पुन्हा आज उपोषणाला बसलेले आहेत. आज १० ११ दिवस उपोषण करतायत. जरांगे यांच्या जीवाला उपोषणामुळे धोका नाही, सलाईन, ग्लुकॉन डी घेतात, त्यांना ते दिले जाते. बाथरूममध्ये जाऊन ते काय काय खातात ते सगळे माहिती आहेत. जरांगे यांनी तिन्ही ऋतूत आंदोलन करण्याचा ट्रेंड सेट केला आहे ते आता हे नेहमी करणार आहेत. वाशीच्या भाजीपाला मार्केटमध्ये सगेसोयरे मुद्दा घेऊन त्यांनी आंदोलन केल. त्या मुद्यांचं नेमक काय झाले महाराष्ट्राला सांगू शकाल का? जरांगे किती हटणार आहे मागे, हैदराबाद गॅझेट, कोणते मुद्दे कसे मांडायचे ते तरी माहितीय का ? कोण अभ्यासक तुमच्या सोबत आहे. आमच्या आईबहिणींना मायमाऊलींना दोन दोनदा खोटेपणाने नाचवलं. काय तुमची मागणी आहे ते तरी माहितीय का ? मनोज जरांगे पाटील यांचं सही असलेले एकतरी निवेदन दाखवा. फक्त चार जणांचे दाखले मिळवण्यासाठी हे असले आंदोलन करताय लाज वाटते का ? जरांगेच्या आसपास असणाऱ्या आजूबाजूची टोळी एवढी श्रीमंत झाली ?
पांडुरंग तारक तुमच्यासोबत तीन वर्षापासून सावलीसारखा फिरतो काहीही कामधंदा करत नाही तरीही २८ एकर जमीन कशी काय घेतली हे ७ १२ उतारे आहेत माझ्याकडे. सगळ्या समजला हिशोब द्यायचा आहे. मोटरसायकल नसलेला जरांगे दोन कोटीच्या डिफेंडरमधून फिरतोय. मराठा समाजातील गरीब घराण्यातील लोक सरकारी रुग्णालयात उपचार घेतात आणि तुझ पोरग लीलावती रुग्णालयात उपचार घेत तेही लक्सरियास उपचार अशी टीका बारसकर यांनी केली आहे.
Leave a Reply