• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IMD Rain Alert : सावधान व्हा… या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात…

September 11, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून रुसलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम आणि पश्चिम मंध्य बंगालची खाडी आणि त्याला लागून असलेल्या दक्षिण ओडिसा-उत्तर आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावर कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे आजपासूनच छत्तीसगड आणि ओडिशात पावसाला सुरुवात होणार आहे. तर 13-14 सप्टेंबर रोजी पश्चिम मध्य प्रदेश, 13 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, 13-14 तारखेला गुजरात आणि 14 सप्टेंबर रोजी सौराष्ट्र तसेच कच्छच्या काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे. उत्तर पश्चिम भारतात 11-14 आणि 17 सप्टेंबर रोजी काश्मीर, लडाख, 11-17 सप्टेंबर रोजी हिमाचल प्रदेशात तुरळक पाऊस होणार आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील सात दिवसात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, यूपी, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीर, लडाख आदी ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार आहे. शिवाय या ठिकाणी विजा कोसळण्याच्या घटनाही घडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान विदर्भात मोठा पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या ठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं.

एवढंच नव्हे तर याशिवाय, पूर्व भारतातील राज्यांमध्येही मुसळधार पाऊस पडू शकेल असा अलर्ट देण्यात आला आहे. 11 ते 17 सप्टेंबर या सात दिवसांच्या कालावधीत अंदमान आणि निकोबार बेटे, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम येथे पावसाची शक्यता आहे. 11 ते 17 सप्टेंबरदरम्यान गंगेच्या मैदानी भागातील पश्चिम बंगालमध्ये, 11 सप्टेंबर रोजी झारखंडमध्ये आणि 11 ते 12 सप्टेंबरदरम्यान ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर 14 ते 17 सप्टेंबरदरम्यान गंगेच्या मैदानी भागातील पश्चिम बंगालमध्ये, 12 ते 17 सप्टेंबरदरम्यान झारखंडमध्ये, 11 ते 17 सप्टेंबरदरम्यान बिहारमध्ये आणि 13 ते 17 सप्टेंबरदरम्यान ओडिशामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत सरकारची भूमिका काय, गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं
  • IND vs AFG: जसप्रीत बुमराह एका दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
  • लाकडी, धातूची की दगडी.. घराबाहेर कोणत्या मटेरियलची नेमप्लेट लावणं शुभ ?
  • Ishan Kishan Injury : ईशान किशन खेळणार की नाही? सस्पेंस संपला; श्रेयस अय्यरने दिली मोठी अपडेट
  • Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठताच चुकूनही पाहू नका या गोष्टी, संपूर्ण दिवस जाईल खराब

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in