• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Feng Shui : घरात सतत भांडणं होतायेत? पती-पत्नीचं पटत नाही? फेंग शुईच्या या टीप्स ठरतील उपयोगी

July 26, 2026 by admin Leave a Comment


फेंग शुईला चीनी वास्तुशास्त्र असं देखील म्हटलं जातं. पूर्वी फेंग शुई फक्त चीनमध्येच प्रसिद्ध होतं. परंतु काळाच्या ओघात आता फेंग शुई शास्त्र जगभरात चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. आपल्या घराला आर्थिक बरकत प्राप्त व्हावी, तसेच घरात सुख, शांती, समृद्धी यावी. घरात विनाकारण होणारे वाद दूर व्हावेत यासाठी फेंग शुईमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, अनेक जण या टिप्स फॉलो करत असतात. फेंग शुईमध्ये काही विशिष्ट झाडं, प्राणी, पक्षी हे शुभ माण्यात आले आहेत. जर हे प्राणी, पक्षी किंवा झाडं जर तुमच्या घरात असतील तर त्यामुळे तुमच्या घरात सतत पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा तुमच्या घरात असलेल्या निगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यास मदत करते, त्याचा शुभ परिणाम तुमच्यावर होतो, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे. जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा त्याचा तुम्हाला फायदा होतो. घरात आर्थिक बरकत, सुख, शांती आणि समृद्धी येते. परंतु याच्या उलट जर तुमच्या घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढला तर मात्र तुमच्या अडचणी वाढू शकतात. घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं होत राहतात, पती-पत्नीचं पटत नाही. आज आपण घरात नकारात्मक ऊर्जा नेमकी कशामुळे निर्माण होते? त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

तुमचं घर स्मशान भूमीच्या परिसरात नसावं- वास्तुशास्त्रानुसार तुमचं घर हे कधीही स्मशान भूमीच्या परिसरात असू नये. यामुळे घरात सतत नकारात्मक तरंग येत राहतात, त्याचा परिणाम हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर होत असतो, आणि समजा अशा ठिकाणी जर घर घ्यावंच लागचं तर सर्व प्रकारचे धार्मिक विधी करून मगच अशा ठिकाणी जागा खरेदी करावी, असं फेंग शुईमध्ये सांगितलं आहे.

घराचा पुढचा दरवाजा आणि पाठीमागचा दरवाजा समरासमोर असू नये – फेंग शुई शास्त्रानुसार तुमच्या घराचा पुढचा दरवाजा आणि पाठीमागचा दरवाजा हा कधीही समोरा -समोर असू नये. यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत राहते, ज्याचा अशुभ प्रभाव हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर पडतो. घरात कायम आर्थिक अडथळे येत राहतात, तसेच पती-पत्नीमध्ये देखील सारखे वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे दोन्ही दरवाजे समोरासमोर असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

घराच्या खिडक्यांची दारे – तुमच्या घरातील खिडक्यांची दारे नेहमी बाहेरच्या दिशेनं उघडणारी असावीत, घराच्या आतील बाजूस उघडणारी नकोत, असं देखील फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. जेव्हा तुमच्या घराच्या खिडक्यांची दारे ही बाहेरच्या दिशेनं उघडतात, तेव्हा घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहते, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in