• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Fatima Sana: श्रीलंकेकडून सपाटून मार, मैदानावरच फुटला अश्रूंचा बांध! ढसाढसा रडली पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना

September 12, 2026 by admin Leave a Comment


Sri Lanka Beat Pakistan: महिला आशिया चषकात (Womens Asia Cup 2026) काल श्रीलंकेच्या महिला संघाने पाकिस्तानला लोळावले. या सनसनाटी सामन्यात चार गडी राखत श्रीलंकेने पाकिस्तानला धूळ चारली. अखेरच्या षटकापर्यंत हा सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याने उत्कंठा वाढवली. अवघ्या काही धावांनी पाकिस्तानचे विजयाचे स्वप्न भंगले. जणू नियतीने पाक संघासोबत क्रूर डाव खेळला. तोंडचा घास पळवल्याने पाकिस्तानची युवा कर्णधार फातिमा सन हिच्या अश्रूंचा बांध फुटला. ती मैदानातच ढसाढसा रडली.

पाकिस्तानची उपांत्य सामन्यातही रडारड

या स्पर्धेत अनेकदा पाकिस्तानी संघाची हाराकिरी पाहायला मिळाली. उपांत सामन्यात पाकिस्तानचा महिला संघ जबरदस्त कामगिरी करून कमबॅक करेल आणि भारतासोबतचा अंतिम सामना हायहोल्टेज रंगेल अशी आशा होती. पण श्रीलंकेविरोधातील सामन्याची सुरुवात गडबडली. पाकिस्तानच्या महिला संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. हा संघ 130 धावांवर तंबूत परतला. श्रीलंकेने 6 बळी टिपले. फातिमाने 36 चेंडूत 47 धावांची नाबाद खेळी खेळली. तिचे अर्धशतक हुकेल. उकाड्याने खेळाडू हैराण झालेले दिसले. तुबा हसन हिच्यासोबत सना हिने संघाला 130 धावांपर्यंत खेचले.

हातातून निसटलेला सामना श्रीलंकेने जिंकला

श्रीलंका संघाला मोठे आव्हान नव्हते. पण तरीही या संघावर अनामिक दडपण दिसले. सुरुवातीलाच झटपट विकेट पडल्या. कर्णधार चमारी अटापट्टू आणि संजना कविंदी ही जोडगोळी तंबूत परतली. एकावेळी तर श्रीलंकेची चार बाद 33 धावा अशी विदारक स्थिती होती. पाकिस्तान हा सामना खिशात घालेल असे चित्र होते. पाकिस्तानची बाजू मजबूत झाली होती. पण हर्षिता समरविक्रमा आणि कविसा दिलहारी यांनी 67 धावांची उत्तम कामगिरी करत श्रीलंकेला विजयाच्या सीमारेषेवर आणून सोडले.

आणि त्या षटकाराने पाकचे स्वप्न धुळीस मिळवले

समरविक्रमा आणि दिलहारी या पायचित झाल्या. त्यानंतर सामना पुन्हा पालटला. पाकिस्तानच्या आशा पल्लवित झाल्या. पण कौशानी नुत्यांगना आणि नीलाक्षिका सिल्वा यांनी निसटता विजय पकडून ठेवला. नुत्यांगना हिने फातिमाच्या चेंडूवर तिच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील पहिला षटकार ठोकला आणि नंतर सिल्वाने चौकार ठोकून श्रीलंकेला विजय मिळवून दिला. या षटकार आणि चौकाराने पाकचे स्वप्न धुळीस मिळाले.

मैदानावरच कोसळले रडू

शेवटच्या टप्प्यातील एक षटकार आणि चौकाराने या सामन्याची दिशाच बदलली. पारडे पालटले. पाकिस्तानच्या हातातून श्रीलंकेने सामना हिसकावला. त्यानंतर पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना मैदानातच ढसाढसा रडली. उपांत्य फेरीत हाराकिरी झाल्याने तिला अश्रू अनावर झाले. पाकिस्तानीच नाही तर श्रीलंकेच्या महिला संघातील खेळाडूंनीही तिची समजूत काढली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Milk Preservation: दूध लगेच होतंय खराब, ‘या’ चुका करणं आजच टाळा…
  • सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट… संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
  • Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन राजकारण करणार? अमृता फडणवीसांनी दिले स्पष्ट उत्तर, काय म्हणाल्या?
  • सीजेपी नेत्याचे सरकारवर गंभीर आरोप, खळबळजनक खुलासा..
  • Manoj Jarange Patil : आंदोलनासाठी मुंबईला जायचं की नाही? अखेर मनोज जरांगेंनी फायनल निर्णय घेतला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in