• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Fact About Medicine: औषधी गोळीच्या मध्यभागी का असते रेषा? काय आहे त्यामागील कारण?

April 25, 2026 by admin Leave a Comment


Medicine Related Important Fact: औषधांविषयी अनेक लोकांना कमी माहिती असते. औषधांवर विविध प्रकारचे रंग, निशाणी, खून असतात. पॅकेटच्यामागील बाजूस असलेले शब्द कोणत्या ना कोणत्या गोष्टींचे संकेत जरूर करतात. पण लोक अशा खुणांकडे दुर्लक्ष करतात. औषधांविषयीची रंजक माहिती तुम्हाला माहिती आहे का? काही गोळ्यांच्या मध्यभागी एक रेष असते. असी रेष का देण्यात येते? काय होतो त्याचा अर्थ?

औषधी गोळीच्या मध्यभागी कसली रेषा?

आपण मेडिकलवर जाऊन डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घरी घेऊन येतो. यामध्ये काही लिक्विड तर काही गोळ्या असतात. या गोळ्या सुद्धा विविध रंगी असतात. या गोळ्या विविध आकाराच्या असतात. काही गोल, काही लंबगोल, तर काही त्रिकोणीही असतात. पण यातील काही गोळ्यांच्या मध्यभागी एक रेषा असते. अर्थात ही काही डिझाईन नाही. तर तुम्ही किती प्रमाणात ती गोळी घ्यावी यासाठी केलेली खूण असते. जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातात तेव्हा वेगवेगळी वेळ आणि मात्रा सांगितली जाते. काही गोळ्यांच्या मध्यभागी रेषा नसते. त्याचा अर्थ असा आहे की ही ती एक गोळी घ्यायची आहे, ती तोडायची नाही.

उदाहरणार्थ डॉक्टरने एखादी गोळी दिली आणि तिचा 500mg डोज घ्यायचा सांगितला आणि ही गोळी 1000mg असेल तर तुम्हाला ती गोळी अर्धी करून घ्यायची आहे. ती संपूर्ण गोळी घ्यायची गरज नाही. त्याचा अर्थ तुम्हाला ही गोळी मध्य भागातून तोडावी लागेल. त्यासाठी ही मध्य रेषा देण्यात आली आहे. अर्धी गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी लागेल. थोडा जोर लावल्यास 1000 mg डोजची गोळी 500 mg च्या दोन बरोबर हिश्यात तुटेल.

गोळीच्या मध्यरेषेला म्हणतात काय?

अनेक औषधी गोळ्यांच्या मध्यभागी एक थेट निशाण करण्यात येते. त्याला Debossed Line असे म्हणतात. या रेषेचा अर्थ की गोळी मधोमध तोडून ती घ्यायची आहे. अशा प्रकारचे निशाण त्याच औषधांवर असते ज्यांची क्षमता अधिक असते. ज्यांची पॉवर अधिक असते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी अशी रेष असलेली गोळी तुम्हाला देण्यात येईल, तेव्हा डॉक्टरांना ती गोळी अर्धी घ्यायची आहे का याविषयीची माहिती विचारून घ्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कॅच घेताना डोक्यावर पडला, लुंगी एन्गिडीला जबर दुखापत! डोळेही उघडेना, एम्ब्युलन्समधून नेण्याची वेळ
  • देशात कोणत्या स्कूटरची सर्वाधिक विक्री? पाहा टॉप-10 ची यादी, तुमच्या आवडीची स्कूटर कितव्या क्रमांकावर?
  • भोंदू बाबा मनोहर भोसले याचा २७ एकरावरील आलिशान आश्रम चर्चेत, दर अमावस्येला भरायचा दरबार
  • मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया
  • IPL 2026 : गेलची बरोबरी, संजूला पछाडलं, केएलचं रेकॉर्ड ब्रेक शतक, काय केलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in