• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

EV मार्केटमध्ये ‘टाटा’चा धमाका! विकली जाणारी दर चौथी कार इलेक्ट्रिक, विक्रीचे आकडे पाहून सगळेच थक्क!

September 11, 2026 by admin Leave a Comment


टाटा मोटर्सने भारतीय बाजारात आपले पाय घट्ट रोवले आहेत. टाटा मोटर्सने भारतीय बाजारात पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार निर्मितीत आपलं मजबूत स्थान निर्माण केलं आहे. गेल्या काही वर्षात टाटा कंपनीने आपल्या वाहनांमध्ये महत्त्वाचे बदल केले. त्याचा परिणाम विक्रीच्या आकडेवारीत दिसून आला आहे. ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी पाहिल्यानंतर हे सहज लक्षात येईल. टाटा मोटर्सने या महिनल्यात एकूण 67,753 प्रवासी गाड्यांची विक्री केल्याचा दावा केला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत 56 टक्क्यांची वाढ झाली आहे. यात इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्यांची मागणी अधिक असल्याचं दिसून आलं आहे. टाटा मोटर्स बऱ्याच काळापासून इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत होती, आता त्याला यश मिळताना दिसत आहे.

टाटा मोटर्सने ऑगस्ट 2026 मध्ये 16 हजाराहून अधिक इलेक्ट्रिक कार विकल्या. कंपनीच्या एकूण प्रवाशी वाहन विक्रीत इलेक्ट्रिक कारचा वाटा अंदाजे 25 टक्के होता. टाटा पंच ईव्ही आणि नेक्सॉन ईव्ही सारख्या वाहनांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. वाढलेली रेंज, सुरक्षिततात आणि चार्जिंग नेटवर्कमुळे इलेक्ट्रिक कार खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. पेट्रोल आणि डिझेल गाड्यांऐवजी इलेक्ट्रिक पर्यायांचा विचार केला जात आहे. इलेक्ट्रिक कारसोबत सीएनजी वाहनांची मागणीही वाढली आहे. टाटाच्या एकूण विक्रीत सीएनजी मॉडेल्सचा वाटा अंदाजे 28 टक्के आहे.

टाटा टियागो, टिगोर, पंच आणि अल्ट्रोजसारखे मॉडेल्स सीएनजी पर्यायांसह आहेत. या गाड्यांमध्ये बूट स्पेसच्या बाबतीत कोणतीच तडजोड करावी लागत नाही. इतकंच काय तर या सीएनजी गाड्यांमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. दुसरीकडे, टाटा कर्व्हला बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीला आशा आहे की, नवीन मॉडेलमुळे विक्रीत अशीच वाढ होत राहील.

टाटा मोटर्सची पुढची योजना काय?

टाटा मोटर्स येत्या काही वर्षात आपले सध्याचे स्थान आणखी पक्कं करण्यासाठी नवीन मॉडेल्स आणि अद्ययावत वाहने बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. सध्याची ग्राहकांची मागणी पाहता इलेक्ट्रिक आणि सीएनजी सेगमेंटवर लक्ष केंद्रीत करत आहे. कंपनीला आशा आहे की, नवीन मॉडेल्स, सुधारित सुरक्षा आणि कमी देखभाल खर्चामुळे सणासुदीच्या काळात विक्रीला आणखी चालना मिळेल.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाजारपेठा एकमेकांसाठी खुल्या करा, स्थानिक चलनात व्यवहार करा, BRICS देशांना पीयूष गोयल यांचे आवाहन
  • Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
  • पाकिस्तानी क्रिकेटपटूवर कशी वेळ आली? सोशल मीडियावर मागितलं काम, म्हणाला…
  • शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीवर उदय सामंत संतापले, आता शेवटची संधी…, दिला मोठा इशारा
  • गुलाबी साडीत अमृता खानविलकरचा रॉयल अंदाज! मोत्यांचे दागिने अन् मोहक अदा पाहून चाहते घायाळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in