• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs PAK : पाकिस्तानच्या नव्या वकार युनुसची बॅटिंगमध्ये पण कमाल, 9 व्या नंबरवर येऊन मारल्या 9 SIX, रजाउल्लाह सुसाट VIDEO

September 12, 2026 by admin Leave a Comment


एजबेस्टन टेस्टमधून डेब्यू करणारा पाकिस्तानचा 21 वर्षांचा खेळाडू रजाउल्लाहने कमाल केली आहे. इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानी क्रिकेट संघाची लाज निघाली. पण या 21 वर्षाच्या खेळाडूने सर्वांना जिंकून घेतलं. आधी त्याने बॉलिंगमध्ये आपला जलवा दाखवला त्यानंतर फलंदाजीत. लक्षात राहील असा त्याने कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू केला आहे. बर्मिंघमच्या एजबेस्टम मैदानातील टेस्टमध्ये रजाउल्लाहने पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट काढले. त्यानंतर शुक्रवारी पाकिस्तानच्या दुसऱ्या इनिंगमध्ये कमालीची बॅटिंग केली. त्याने 63 चेंडूत 81 धावा फटकावल्या. यात 9 सिक्स आणि 4 फोरचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे तो 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला.

दुसऱ्याडावात पाकिस्तानच्या 312/7 अशी स्थिती असताना रजाउल्लाह फलंदाजीला आला. इंग्लंडकडे आघाडी होती. पाकिस्तानी टीम 320 धावांनी पिछाडीवर होती. अजान अवैस (59 रन), शान मसूद (95 रन) आणि कॅप्टन बाबर आजम (76 रन) धावांची खेळी केलेली. रजाउल्लाहने मोहम्मद अब्बास (42 रन) सोबत मिळून नवव्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी केली. पाकिस्तानने आपल्या दुसऱ्याडावात 449 धावा केल्या. इंग्लंडसमोर विजयासाठी 130 धावांचं टार्गेट ठेवलं. इनिंगच्या 97 व्या ओव्हरमध्ये डॅन लॉरेन्सच्या गोलंदाजीवर स्टम्पिंग होण्याआधी रजाउल्लाहने 81 धावा केल्या.

सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड

रजाउल्लाहने टेस्ट डेब्यूमध्ये एकाडावात सर्वाधिक सिक्स मारण्याच्या बाबतीत न्यूझीलंडच्या टिम साऊदीच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. साऊदीने 2008 साली इंग्लंड विरुद्ध टेस्ट डेब्यू करताना एकाडावात 9 सिक्स मारले होते. रजाउल्लाहच्या बाबतीत विशेष बाब म्हणजे त्याने परदेशी भूमीवर टेस्ट डेब्यू करताना एका डावात सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. याआधी हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या काइल मेयर्सच्या नावावर होता. त्याने 2021 साली बांग्लादेश विरुद्ध डेब्यू टेस्टमध्ये 7 सिक्स मारले होते.

RAZAULLAH 6 INTO THE HOTEL!! pic.twitter.com/1fGMtpJwM5

— PctMedia (@PctMediaa) September 11, 2026

रजाउल्लाह काय म्हणाला?

तुफानी इनिंग खेळल्यानंतर रजाउल्लाह म्हणाला की, “जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करण्याचा माझा प्रयत्न होता. गोलंदाज माझ्या आवडत्या टप्प्यावर गोलंदाजी करत होता, त्याचा मी फायदा उचलला” या इनिंग दरम्यान माझ्या दोन बॅट तुटल्याचं रजाउल्लाहने सांगितलं. पण त्याला अजिबात भिती वाटली नाही. जेव्हा कुठला खेळाडू आपल्या देशासाठी खेळतो, तेव्हा भितीचा प्रश्न नसतो. मी मैदानावर प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होतो असं रजाउल्लाह म्हणाला.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुरुंगात मोबाईल, फोनमध्ये पॉर्न! माजी पंतप्रधानांच्या नातवाचा कारनामा; देशभरात खळबळ
  • माझा भाऊ शांततापूर्वकच… अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
  • ते एव्हरग्रीन गाणे ऐकताच येते लता मंगेशकर यांची आठवण, पण गाण्याची खरी गायिकाच वेगळी
  • MPSC विद्यार्थ्यांसाठी लढणारे रोहित पवार स्वत: मात्र काठावर पास, विद्यार्थ्यांशी बोलताना बरंच काही सांगितलं
  • Fatima Sana: श्रीलंकेकडून सपाटून मार, मैदानावरच फुटला अश्रूंचा बांध! ढसाढसा रडली पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in