• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs PAK : पाकिस्तानचा नवीन वकार युनुस, कोण आहे रजाउल्लाह? पहिलाच बॉल असा टाकला सगळ्या जगाला कळलं टॅलेंट

September 10, 2026 by admin Leave a Comment


इंग्लंड विरुद्ध पहिले दोन कसोटी सामने गमावून पाकिस्तानने आधीच सीरीज गमावली आहे. पाकिस्तान टीमचं इंग्लंड दौऱ्यात खूप लाजिरवाणं प्रदर्शन सुरु आहे. बर्मिंघममध्ये 9 सप्टेंबरपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचा डाव अवघ्या 133 धावात आटोपला. गोलंदाजीला अनुकूल असलेल्या वातावरणात इंग्लिश वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजीचं कंबरडं मोडून ठेवलं. पाकिस्तानची गोलंदाजीची संधी आली, त्यावेळी समोर असा एक बॉलर उभा होता, जो अनोळखी होता, त्याला कोणी ओळखत नव्हतं. पण पुढच्या काही सेकंदात सगळ्या जगाला त्याच्याबद्दल समजलं.

टेस्ट करिअरमधला पहिलाच चेंडू त्याने 143KM/H वेगाने. ओव्हरमधला तिसरा बॉल 144 KPH वेगाने टाकला. त्याने चौथा चेंडू देखील तितक्याच जोरात टाकला, जो इंग्लंड कॅप्टन जो रुटच्या पॅडला धडकला. अपील झाल्यानंतर अंपायरने लगेच रुटला बाद ठरवलं. म्हणजे कसोटीमध्ये आपल्या गोलंदाजीवर पहिली धाव देण्याआधी रजाउल्लाहने इंग्लंडच्या नामवंत फलंदाजाची विकेट काढली.

..तर त्याला संधी मिळाली नसती

सगळ्या जगासाठीच नाही, तर रजाउल्लाहला पाकिस्तानी क्रिकेट चाहते सुद्धा ओळखत नव्हते. रजाउल्लाह कोणी असा खेळाडू नाहीय की, पाकिस्तानने त्याला खास टेस्ट क्रिकेटसाठी तयार केलय. इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्याआधी त्याच्या नावावर फक्त आठ फर्स्ट क्लास मॅचेस आहेत. PSL मध्ये खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव नक्की आहे. पण कसोटी क्रिकेटचा अनुभव फार कमी आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये फिक्सिंग विषय पुन्हा आला नसता, त्या सात खेळाडूंना परत पाठवलं नसतं, तर इंग्लंड दौऱ्यात रजाउल्लाहला एका कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नसती.

तुफानी वेगामुळे ब्रूक जमिनीवर पडला

जो रुटची विकेट काढल्यानंतर रजाउल्लाह अजून धोकादायक बनला. तो सतत 140 KPH च्या वर वेगाने गोलंदाजी करत होता. पुढचा नंबर हॅरी ब्रूकचा होता. त्याच्या तुफानी वेगामुळे ब्रूक जमिनीवर पडला. ओपनर एमिलियो गे (60) रजाउल्लाहचा दुसरा विकेट ठरला. रजाउल्लाहने पहिल्याच टेस्टमध्ये सिद्ध केलय की, तो स्विंग आणि सीमवर अवलंबून राहणारा गोलंदाज नाहीय. पाकिस्तानच्या जुन्या धुरंधरांप्रमाणे वेग त्याचं प्रमुख शस्त्र आहे. सोशल मीडियावर रजाउल्लाहची तुलना पाकिस्तानचा पूर्व पेसर आणि माजी कर्णधार वकार युनुसशी सुरु झालीय. दोघांची Action आणि चाल यामध्ये समानता आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लहान मुलांच्या नाक-कानात एखादा चुकून पदार्थ अडकला, पालकांनी काय करावे अन् काय करून नये?
  • जरांगे पाटलांच्या आंदोलनाला किती यश? आतापर्यंत किती मागण्या मान्य? कलेक्टर मॅडमने यादीच दिली
  • बोले तो अस्लम भाय लुढ़क गया… आयफोन लॉन्च होताच सोशल मीडियावर फिल्मी मिम्सचा बेक्कार पाऊस; किमतीने उडवली झोप
  • रोहित शर्माच्या टी-शर्टवरील मेसेजने वादाला फोडणी! अजित आगरकर आणि बीसीसीआयवर निशाणा साधला?
  • Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in