
एलेना रायबकिना हीने ऑस्ट्रेलियन ओपन प्रमाणे युएस ओपन जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. कजाकस्तानची टेनिसपटू एलेना रायबकिना हीने अमेरिकेच्या कॉको गॉफला पराभवाची धूळ चारली आणि अंतिम फेरी गाठली. एलेना रायबकिनाने कोको गॉफविरुद्ध पहिला सेट गमावला होता. पण त्यानंतर जोरदार कमबॅक केलं आणि तिला 3-6, 6-4, 6-4 ने पराभूत केलं. (Photo: Instagram)
एलेना रायबकिना सध्याची स्टार टेनिसपटू आहे. पण तिचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. जीवनात अनेक समस्यांना तोंड देत तिने या यशापर्यंत मजल मारली आहे. टेनिसपटू होण्यासाठी दुसर्या देशाची नागरिकता घ्यावी लागली. (Photo: Instagram)
एलेना रायबकिना 19 वर्षांची होती तेव्हा तिने रशिया सोडून कझाकस्तानची नागरिकता घेतली. कारण तिथे तिला तशी काहीच मदत झाली नाही. कझाकस्तान टेनिस फेडरेशनने रायबाकिनाला निधी, प्रशिक्षण सुविधा आणि पाठिंबा दिला. 2018 मध्ये एलेनाने कझाकस्तानची नागरिकता स्वीकारली. (Photo: Instagram)
एलेना रायबाकिनाला टेनिसपटू होण्यासाठी वडिलांचा मोठा हातभार आहे. त्यांनी तिच्या टेनिस करिअरसाठी कार विकली. पण आज ती कोट्यवधींची मालकीन आहे. यूएस ओपन अंतिम सामना जिंकल्यावर तिला कोट्यवधींची रक्कम मिळणार आहे. (Photo: Instagram)
एलेना रायबाकिनाने युएस ओपन महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले, तर तिला 5.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 53 कोटी रुपये मिळतील. (Photo: Instagram)




Leave a Reply