
Deool band 2 OTT: दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ सिनेमाने 100 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आणि मराठी सिनेविश्वात एक मोठा इतिहास रचला. बॉक्स ऑफिस बक्कळ कमाई केल्यानतंर ‘देऊळ बंद 2′ सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्यामुळे आता ज्यांनी सिनेमा पाहिला नाही, त्यांना घरबसल्या सिनेमा पाहता येणार आहे. खुद्द प्रवीण तरडे यांनी याबद्दल मोठा खुलासा केला आहे.’देऊळ बंद 2’ सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
सांगायचं झालं तर, चित्रपटगृहात यश मिळवल्यानंतर आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर हा ब्लॉकबस्टर सिनेमा आता ओटीटीवर स्ट्रीम झाला आहे. प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. पोस्ट करत प्रवीण तरडे यांनी लिहिलं, ‘आपला ‘देऊळ बंद 2’ सिनेमा आता ॲमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे.’ एवढंच नाही तर, पोस्टला कॅप्शन देत प्रवीण तरडे म्हणाले, ‘ज्यांनी ज्यांनी अजुनही पाहीला नाही त्यांनी नक्की बघा ज्यांनी पाहीलाय त्यांनी पुन्हा पुन्हा बघा .. कारण कितीही वेळा पाहीला तरी पोट भरणार नाही आणि डोळ्यातलं पाणीही थांबणार नाही..’, पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
‘देऊळ बंद 2’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 21 मे रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सिनेमात अभिनेते मोहन जोशी यांनी मुख्य भूमिका म्हणजे स्वामी समर्थांची भूमिका साकारली. तर अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी साकारलेल्या भूमिकेला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.
एवढंच नाही तर, ‘देऊळ बंद 2’ नंतर आता प्रेक्षक ‘देऊळ बंद 3’ च्या प्रतिक्षेत आहे. सिनेमाच्या शेवटी राघव शास्त्रीला म्हणजे अभिनेतागश्मीर महाजनी याला अमेरिकेत असताना थेट अक्कलकोटहून स्वामी समर्थांचा फोन येतो. त्यानंतर दोघांचं बोलणं देखील होतं.. आता ‘देऊळ बंद 3’ मध्ये काय असणार हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. आता सिनेमाच्या तिसऱ्या भागासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Leave a Reply