• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?

September 11, 2026 by admin Leave a Comment


नागपूर येथे आयोजित पारंपरिक मारबत उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी बोलताना, जवळपास दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवातून समाजातील इडापिडा जाळल्या जातात, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जीवनातील सर्व इडापिडा दूर व्हाव्यात, विशेषतः दुष्काळाची पिडा टळावी, ही आपली इच्छा असल्याचे फडणवीस म्हणाले. नागपूर महानगरपालिकेने मारबतला जागतिक महोत्सव म्हणून पुढे आणण्यासाठी परदेशी पाहुण्यांना आणि कौन्सिल जनरलना आमंत्रित केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. यामुळे मारबतला एक जागतिक ओळख मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एमपीएससी संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केले. सरकार सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका घेत असून, परीक्षेतील गडबड करणाऱ्यांना जेरबंद केले आहे. तसेच, भविष्यात पारदर्शक परीक्षा पद्धती आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही लोक क्रेडिट घेण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी याचा वापर करत असल्याची टीका त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या तुम्ही सुट्ट व्हा, मुंबईत चला या विधानावर, छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घाण झालेली पाण्याची बॉटल कशी साफ करावी, या 4 गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं; वाचा…
  • Sunil Gavaskar : भारतीय क्रिकेटचा सीझन संपतच नाही, सुनील गावसकरांनी स्पष्टपणे मांडलं निर्भिड मत
  • फिटनेससाठी कांगारुचे मटण खाते ही ऑस्ट्रेलियन खेळाडू, ऑलिम्पिकमध्ये चमकली होती…
  • इतकी क्रेझ की… रेडिओवर या गाण्याची व्हायची सर्वात जास्त मागणी, प्रदर्शित होताच विकली होती लाखो कॅसेट
  • CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in