• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टींपासून दूरच रहा, अन्यथा घर होईल उद्ध्वस्त

July 13, 2026 by admin Leave a Comment


आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते.  त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या जगात वावरत असताना तुम्हाला तुमचं प्रत्येक पाऊल हे खूप काळजीपूर्वक टाकावं लागतं. जर तुमचं एखादं पाऊल जरी वाकडं पडलं तरी देखील तुमचं तर नुकसान होतंच परंतु तुमचं संपूर्ण घर उद्ध्वस्त होतं. अशा काही गोष्टी असतात, ज्याच्यापासून मानसाने नेहमी दूर राहिलं पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

व्यसन – चाणक्य म्हणतात व्यसन कुठलंही असो, दारूचं असो अथवा अन्य कोणतंही जर एखादा माणूस व्यसनाच्या आहारी गेला तरी त्याच्या संसाराचं वाटोळ होतं. असा माणून पैशांसाठी आपलं घरदार विकण्यास देखील मागं पुढे पहात नाहीत. अशा माणसाच्या मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, कष्ट करावे लागतात, त्यामुळे कधीही कोणतंही व्यसन करू नका.

जुगार – चाणक्य म्हणतात जुगाराचा नाद हा अत्यंत घातक आणि वाईट आहे. जो माणूस जुगाराच्या नादी लागतो, तो उद्ध्वस्त होतो. त्याचं आयुष्य म्हणजे संकटाने भरलेली एक मालिका असते. एक दिवस असा येतो की, या माणसाच्या आयुष्यात काहीच शिल्लक राहत नाही. सर्व घरदार उद्ध्वस्त होतं. त्यामुळे माणसाने नेहमी जुगारीपासून दूर रहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

परस्त्री – चाणक्य म्हणतात भारतीय संस्कृतीमध्ये परस्त्री ही मातेसमान असते. त्यामुळे जे विवाहित पुरुष आहेत, त्यांनी परस्त्रीपासून दूर रहावं. आपल्या पत्नीसोबत आयुष्यभर प्रामाणिक राहावं, त्यातच तुमचं भलं आहे. तसेच पत्नीने देखील आपल्या पतीसोबत एकनिष्ठ असावं असा सल्ला देखील चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in