उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच एका सार्वजनिक सभेत उद्योगमंत्री उदय सामंत यांना थेट फोन करून सर्वांचे लक्ष वेधले. संगमनेर येथे अमोल खताळ यांच्या मागणीनुसार एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) स्थापनेबाबत शिंदे यांनी सामंत यांच्याकडे विचारणा केली. “गृहनिर्माण विभाग आणि नगर विकास विभाग दोन्ही माझ्याकडे आहेत, आणि आता उद्योगमंत्री उदय सामंत आहेत. मी अमोल खताळ यांच्या […]
Latest News
SMAT 2025: बिहार संघाचा वैभव सूर्यवंशी असूनही दारूण पराभव, 175 धावा गाठताना झाले असे हाल
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत बिहारची सुरुवात काही चांगली झाली नाही. टी20 फॉर्मेटमधील या स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. चंदीगडनंतर मध्य प्रदेशने पराभवाची धूळ चारली आहे. एलीट ग्रुपच्या 19व्या सामन्यात बिहार आणि मध्य प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. बिहारने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात […]
Imran Khan News: पाकिस्तानच्या जेलमध्ये इमरान खान यांची हत्या? अखेर सत्य समोर! पक्षाकडून मोठा खुलासा
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांना अडियाल तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तौशखाना व भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये त्यांना 14 वर्षांची शिक्षा झाली. पण गेल्या काही दिवसांपासून इमरान खान यांना कोणालाही भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वत्र त्यांच्या निधनाच्या अफवा सुरु होत्या. सोशल मीडियावर गुरुवार (27 नोव्हेंबर 2025) रोजी […]
रशियाने फेकली अमेरिकेच्या डोळ्यात माती, 220000000000 रुपयांचे रशियन तेल भारतात, धक्कादायक रिपोर्ट, खोटे झेंडेही…
भारतासह अनेक देशांवर अमेरिकेचा रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केल्याचा दावा केला जात आहे. हेच नाही तर भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. भारत आणि रशियातील चांगले संबंध आजपासूनचे नाही तर अनेक वर्षांचे आहेत. भारताचे बऱ्यापैकी अर्थिक गणित रशियाच्या तेलावर अवलंबून […]
पाकिस्तानची सर्वात महागडी कार कोणाकडे ? कोट्यवधी रुपये आहे किंमत…
आपला शेजारील पाकिस्तान हा सतत अस्थैर्य आणि राजकीय तसेच उलथापालथी होणारा देश आहे. या देशात टोकाची गरीबी असली तरी श्रीमंत लोकही आहेत. या श्रीमंताचे थाट विकसित देशातील श्रीमंताहून कमी नाहीत. तर या कंगाल पाकिस्तानात सर्वात महागडी कार कोणाकडे आहे हे कळाले तर तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहाणार नाही. पाकिस्तानच्या एक्साईज विभागात एवढी महाग कार कधी रजिस्टर […]
Chandrapur : भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला नागरिकांनी सुनावलं, प्रचारादरम्यान धारेवर धरलं; VIDEO व्हायरल
चंद्रपूरमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांना प्रचारादरम्यान नागरिकांच्या तीव्र प्रश्नांना सामोरे जावे लागले. वॉर्डात मागील अनेक वर्षांपासून विकास न झाल्याने, पाणी, रस्ते आणि गटारी यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक संतप्त होते. घरकुल योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. दारूबंदीच्या मुद्द्यावरही नागरिकांनी धानोरकर यांना जाब विचारला, ज्यामुळे सामाजिक समस्या निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधले. […]