• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BRICS Summit 2026 : ब्रिक्स सम्मेलनासाठी दिल्लीत येणारे शी जिनपिंग या खास कारमधून फिरणार, फिचर्स जाणून तुम्ही हैराण व्हाल

September 11, 2026 by admin Leave a Comment


चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे 12 ते 13 सप्टेंबर रोजी दिल्लीत दाखल होणार आहेत. दिल्लीमध्ये 18वी ब्रिक्स परिषद पार पडणार आहे. यासाठी ते हजेरी लावतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना निमंत्रणही दिले आहे, त्यानंतर जिनपिंग हे या शिखर परिषदेला हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एकीकडे त्यांच्या भारत दौऱ्याकडं सर्वांचे लक्ष लागलं आहे, तर दुसरीकडे ऑटोमोबाईलप्रेमींचे सगळे लक्ष हे जिनपिंग यांच्या कारकडे लागले आहे. यामागचं कारण म्हणजे जिनपिंग हे Hongqi N701 ही त्यांची गाडी सोबत घेऊन भारतात येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ही गाडी सुरक्षेला प्राधान्य देत खास पद्धतीने डिझाईन केलेली कार आहे. चीनच्या अध्यक्षांच्या या खास कारची वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल जाणून घेऊयात.

Hongqi N701 ही चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी बनवण्यात आलेली अत्यंत सुरक्षित आणि लक्झरी कार आहे. पुढील 100 वर्षांमध्ये या कारच्या फक्त 50 युनिट्स बनवल्या जाणार आहेत. एल5 लिमोझिन कारसारखी दिसणारी आहे. विशेष बाब म्हणजे 2025 मधील चीन दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कारचा वापर केला होता.

कारची वैशिष्ट्ये काय?

या कार आणि डिझाइनबद्दल बोलायचं झाल्यास, या लिमोझिन कारची लांबी 5.5 मीटर एवढी आहे. ही गाडी Hongqi ब्रँडने तयार केलेली आहे. या गाडीचे सविस्तर तपशील कंपनी कधीच सार्वजनिक करत नाही. जिनपिंग त्यांच्या प्रत्येक विदेश दौऱ्यामध्ये या गाडीला सोबत घेऊन जातात. या गाडीच्या सुरक्षा फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये बुलेटप्रूफ काच आहे, 21 इंचाचे बुलेटप्रूफ टायर्स आहेत. त्याशिवाय मजबूत आर्मर प्लेटिंग आणि छोटे बॉम्ब गोळे झेलण्याची क्षमता आहे.

केमिकल हल्ल्यापासूनही बचाव करते

एवढंच नाही तर ही गाडी केमिकल हल्ल्यापासूनही बचाव करु शकते. कारमध्ये अत्याधुनिक एअर-कंप्रेशन सिस्टीम बसवण्यात आलेले आहे, जी रासायनिक हल्ले होत असताना केबिनमधील प्रवाशांचे रक्षण करते. हे सर्व असतानाच कारमध्ये एक दमदार इंजिन बसवण्यात आले आहे. यामध्ये 6.0 -लीटर V12 इंजिन (408 hp) मिळण्याची शक्यता असून ते V8 पर्यायासह देखील उपलब्ध आहे. त्यामुळे शी जिनपिंग या कारसह भारतात येणार का नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कुठेतरी मर्यादा असली पाहिजे, …त्या मागण्या कशा मान्य करायच्या? गिरीश महाजन मनोज जरांगेंबद्दल स्पष्टच बोलले
  • जुन्या वादातून पिकअप गाडी थेट घरावर घातली, महिला दगावली, गावामध्ये मोठा थरार, नेमकं काय घडलं?
  • न्यूयॉर्कच्या आकाशात पुन्हा उभे राहिले ट्वीन टॉवर, 2,977 ड्रोनद्वारे 9/11 च्या हल्ल्यातील पीडीतांना अनोखी श्रद्धांजली…
  • दिशा सालियान प्रकरणात मोठी अपडेट, सीबीआयने दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवला
  • Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in