• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर

September 12, 2026 by admin Leave a Comment


ब्रिक्सच्या १८ व्या शिखर परिषदेत सदस्य देशांमध्ये संयुक्त निवेदनावर सहमती झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या निवेदनावर सर्व सदस्य देशांनी शिक्कामोर्तब केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, परिषदेदरम्यान अनेक संवेदनशील आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सदस्य देशांमध्ये सुरुवातीला मतभेद होते. मात्र, या मतभेदांवर तोडगा काढण्यासाठी आज पहाटे चार वाजेपर्यंत संयुक्त निवेदनावर चर्चा सुरू होती. भारताने या संपूर्ण प्रक्रियेत सातत्याने पुढाकार घेऊन संवाद साधला आणि सदस्य देशांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला, असे कळते. लवकरच ब्रिक्स सदस्य देशांकडून हे संयुक्त निवेदन अधिकृतपणे जारी केले जाईल.

याशिवाय, आणखी एका महत्त्वाच्या घडामोडीत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित सेवा संकल्प अभियान या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. ही पत्रकार परिषद महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सभागृहात होणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ब्युसी-सेंट-जॉर्ज शहराच्या महापौरांकडून BAPS चे कौतुक
  • तोतया IAS अधिकारी तृप्ती सिंहचे धक्कादायक कारनामे; युपीएससीची लिस्ट एडिट केली आणि…
  • मिर्झापूरमधील मालती भाभी कोण? जिच्या मुन्ना भैयासोबतच्या सीनने सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
  • मुंबईला निघण्यापूर्वीच जरांगे पाटलांच्या अडचणी वाढल्या; गुणरत्न सदावर्ते यांची मोठी घोषणा
  • Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in