• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BRICS Summit 2026 : जगातल्या एका मोठ्या स्टेजवरुन बोलताना पीएम मोदींनी नाव न घेता ट्रम्प यांना दाखवली जागा

September 11, 2026 by admin Leave a Comment


भारतात ब्रिक्स परिषद होत आहे. त्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये बोलताना भारताच्या आर्थिक प्रगतीचं, विकासाच्या गतीचं गुणगान केलं. “आज ब्रिक्सचे देश जगातील 50 टक्के लोकसंख्या 40 टक्के जीडीपी आणि 25 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापार करतात. या वर्षात ग्लोबल जीडीपी 2.5 पट वाटला तेच ब्रिक्स देशाची एकत्र जीडीपी ४.५ पट आहे” अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. “ब्रिक्सची आर्थिक शक्ती दोन पटीने वाढली आहे. ग्रासरुटपासून फ्रंटियर टेक्नोलॉजीपर्यंत इनोवेशनची नवीन शक्यता आकाराला येत आहे. ब्रिक्सचा स्पीड स्पष्टपणे दिसतोय. भारतात आयोजित हा फोरम आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्रिक्स बिझनेस फोरम आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“मागच्या 12 वर्षात भारताने इकोनॉमिक, ट्रेड पॉलिसीला आधार बनवलं आहे. जागतिक परिस्थिती अनिश्चिततेची असताना भारत विकास आणि स्थिरतेचा विश्वास देत आहे. रोड, रेल्वे, पॉड्स, एअरपोर्टचा वेगाने विस्तार करत आहे. सोबत जहाज निर्माण करणारे शिप बिल्डर, क्रिटिकल मिनरल्स, बॉयोटेक सारख्या क्षेत्रात नवीन क्षमता विकसित करत आहे. या क्षेत्रात भारत ग्लोबल बिझनेस, नवीन संधीचं केंद्र बनत आहे. म्हणून मेक इन इंडिय, स्कोल फॉर वर्ल्ड, भारतात स्टार्टअप क्रांती होत आहे” असं पीएम मोदी म्हणाले.

नवीन झेप घेत आहे

“दोन लाखापेक्षा अधिक स्टार्टअप भारतात आहेत. ग्लोबल सोल्युशनस हब बनत आहे. याची एक झलक तुम्हाला इनोवेट एक्सपो मध्ये दिसेल. आमचे स्टार्टअप एआय, हेल्थ केअर, ग्रीन हायड्रोजन, डिफेनस यामध्ये नवीन झेप घेत आहेत. आता ब्रिक्सच्या माध्यमातून वर्ल्ड क्लास इनोवेशन ग्लोबल मार्केट पर्यंत पोहोचायचं आहे” असं पीएम मोदी म्हणाले. “भारतात डिजिटल व्यवहारांना नवीन गती मिळाली आहे. आज जगातील 50 टक्के रिअल टाइम पेमेंट याच टोक्नोलॉजीवर होत आहे. या डजिटल लेयर नवी सोल्युशन एक नवीन ओपन इको सिस्टिम दिली आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

भारत इकोनॉमिक ब्रिजेस बनवत आहे

“भारताच्या या वर्ल्ड क्लास इकोसिस्टिमला अनेक देश स्वीकारत आहेत. ब्रिक्स देश या अनुभवाच्या आधारावर आपल्या देशांसाठी नवीन सोल्युशन्स बनवू शकतात. आज जगात ट्रेड बॅरियर अडथळे वाढत आहेत. भारत इकोनॉमिक ब्रिजेस बनवत आहे. 2024 पासून जगातील 40 देशांसोबत मुक्त व्यापर करार केला आहे. ब्रिक्समध्ये आमचा अप्रोच आहे, अडथळे कमी करुन व्यवसायात संधी वाढवणं हा उद्देश आहे” असं पीएम नरेंद्र मोदी म्हणाले. जगात ट्रेड बॅरियर अडथळे वाढत आहेत, या वाक्याचा संदर्भ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या टॅरिफ वॉरशी आहे. त्यावर पीएम मोदींनी नाव न घेता ट्रम्प यांना जागा दाखवून दिली.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • BRICS Summit 2026 : ब्रिक्स सम्मेलनासाठी दिल्लीत येणारे शी जिनपिंग या खास कारमधून फिरणार, फिचर्स जाणून तुम्ही हैराण व्हाल
  • PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
  • IMD Rain Alert : सावधान व्हा… या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात…
  • Lalbaugcha Raja 2026 First Look: लालबागच्या राजाचा 2026 मधील पहिला लूक समोर; बाप्पाचं भव्य रूप पाहून भक्त भारावले!
  • BRICS Summit 2026 : जगातल्या एका मोठ्या स्टेजवरुन बोलताना पीएम मोदींनी नाव न घेता ट्रम्प यांना दाखवली जागा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in