• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BRICS Summit : भारताचा अमेरिकेला मोठा धक्का, ब्रिक्स परिषदेमधील हा फोटो पाहिलात का? ट्रम्प यांचा होणार जळफळाट

September 11, 2026 by admin Leave a Comment


भारत यजमानपद भूषवत असलेल्या ब्रिक्स परिषदेमधून (BRICS Summit) एक फोटो समोर आला आहे. या छायाचित्राने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. विशेष म्हणजे या छायाचित्रामध्ये भारताची राजनैतिक भूमिका देखील अधोरेखित झाली आहे. हा फोटो विशेष आहे, कारण या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचा हात आपल्या हातात घेतला आहे. सोबतच या फोटोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा हे देखील दिसून येत आहेत. या फोटोमधून भारताची भूमिका स्पष्ट होताना दिसत आहे, अमेरिकेला देखील एक प्रकारे स्पष्ट संदेश गेला आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारी रोजी या युद्धाला सुरुवात झाली होती. अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला आणि युद्धाला सुरुवात झाली. दरम्यान अजूनही हे युद्ध सुरूच आहे. अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत, तर दुसरीकडे इराणची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. इराणसोबत कोणत्याही देशांनी आर्थिक, व्यापारी संबंध ठेवू नये, त्यांच्याकडून कच्च्या तेलाची खरेदी करू नये, यासाठी अमेरिकेकडून अनेक देशांवर दबाव आणण्याचं काम सुरू आहे. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये सुद्धा युद्ध सुरू आहे.

हे युद्ध थांबावाव म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यात अपयश आल्यानंतर आता ट्रम्प यांच्याकडून रशियावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जे देश रशियासोबत व्यापार करतील त्यांच्याकडून कच्चं तेल आणि इंधनाची खरेदी करतील त्या देशांवर देखील आम्ही निर्बंध घालू अशी धमकी देखील अमेरिकेकडून देण्यात आली आहे. मात्र आता ब्रिक्स परिषदेमधून समोर आलेला हा फोटो म्हणजे अमेरिकेनं घेतलेल्या भूमिकेला मोठा धक्का मानला जात आहे.

या छायाचित्रातून भारताने अमेरिकेला एक प्रकारे स्पष्ट संदेश दिला आहे. भारतच भारताचे धोरणं ठरवणार हे यातून अधोरेखित होत आहे. या छायाचित्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचा हात आपल्या हातात घेतला आहे. सोबतच या फोटोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन हे देखील आहेत. या फोटोने सध्या संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jai Khandekar Photos : मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल, चाहते घायाळ; फोटो पाहाच
  • मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत सरकारची भूमिका काय, गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं
  • IND vs AFG: जसप्रीत बुमराह एका दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
  • लाकडी, धातूची की दगडी.. घराबाहेर कोणत्या मटेरियलची नेमप्लेट लावणं शुभ ?
  • Ishan Kishan Injury : ईशान किशन खेळणार की नाही? सस्पेंस संपला; श्रेयस अय्यरने दिली मोठी अपडेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in