• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BRICS summit : दिल्लीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन पोहोचले, शी जिनपिंग कधी येणार? संपूर्ण जगाचं भारतावर लक्ष

September 11, 2026 by admin Leave a Comment


रशियाचे राष्ट्राध्यक्ष क्वादिमीर पुतिन शुक्रवारी राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. पुतिन हे 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या तीन दिवसीय शिबीरासाठी पोहोचले आहेत. या परिषदेदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे. पुतिन हे दिल्लीत आल्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी पुतिन यांचं विमानतळावर स्वागत केलं. शी जिनपिंग यांच्याबाबतही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, शी जिनपिंग शनिवारी सकाळी दिल्लीत पोहोचतील. दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग नोंदवल्यानंतर 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी परततील. त्यांच्यासोबत शनिवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. याआधी ते 2019 साली भारतात आले होते. शी जिनपिंग हे शिखर परिषदेसाठी चेन्नईत आले होते. त्याआधी 2014 साली देखील भारताच्या दौऱ्यावर येऊन गेले आहेत.

शिखर परिषदेच्या मुख्य कार्यक्रमात 12 सप्टेंबर रोजी ब्रिक्स नेत्यांची बैठक होईल. या बैठकीत भारताच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रम, राजकारण, सुरक्षा, अर्थव्यवस्था, वित्त, सांस्कृतिक आदी क्षेत्रांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याविषयी चर्चा केली जाईल.

पंतप्रधान मोदींसोबत होईल द्विपक्षीय चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय बैठक होईल. या बैठकीत लढाऊ विमान आणि उत्पादनावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत रशियाच्या मदतीने लढाऊ विमाने विकसित करण्यास उत्सुक आहे, अशी माहिती मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय बैठक होईल. या बैठकीत लढाऊ विमान आणि उत्पादनावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत रशियाच्या मदतीने लढाऊ विमाने विकसित करण्यास उत्सुक आहे, अशी माहिती मिळत आहे. रशियाची तत्वत: सहमती असल्याची माहिती मिळत आहे. रशियाने 5th जनरेशन लढाऊ विमान, एसयू-57 आधीच विकसित केलं आहेत. रशिया भारताला विकण्यास इच्छुक आहे. भारताने गेल्या काही वर्षांत रणनीती बदलली आहे. त्याचबरोबर संरक्षण उपकरणे देशांअंतर्गत तयार करण्याचा निर्णय घेतलाय.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Drishyam 3 Review: मोहनलाल यांच्या ‘दृश्यम 3’मध्ये दम नाही, थरार हरवला; अजय देवगणला मिळाला मोठा फायदा
  • माझ्या प्रेमात त्यांच्याकडून हाताच्या… राघव चढ्ढा यांनी थेट एक्स गर्लफ्रेंडचे उदाहरण देत..
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे MPSC चे नवे बॉस व्हावे … रोहित पवार यांचा मोठा दावा
  • एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच… गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
  • बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्… बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in