
Blyolwood: बॉलिवूडमध्ये अनेक प्रतिष्ठित कुटुंब आहेत. बच्चन, कपूर… या कुटुंबियांनी बॉलिवूडला अनेक लोकप्रिय आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी दिले आहे. पण झगमगत्या विश्वात असं एक कुटुंब आहे, जे गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. कुटुंबातील प्रत्येक जण स्टार असून, कुटुंबाची संपत्ती इतकी आहे की, पुढच्या अनेक पिढ्या आरामात बसून खातील… तर सध्या ज्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे, ते कुटुंब दुसरं तिसरं कोणतंच नसून खान कुटुंब आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान यांचं कुटुंब बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत कुटुंबियांपैकी एक आहे. सलीम खान यांचं कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.
सलीम खान यांच्या कुटुंबियांबद्दल सांगायचं झालं तर, ते पाच मुलांचे वडील आहेत. सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान, अल्विरा खान अग्नीहोत्री आणि अर्पिता शर्मा… या सर्व भावंडांमध्ये सलमान खान याच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. सांगायचं झालं तर, अभिनेता अरबाज खान, अभिनेता सोहेल खान यांच्याकडे देखील गडगंज संपत्ती आहे. पण सलमान खान याच्या कमाईसमोर दोन्ही भावांच्या कमाईचा आकडा फार लहान आहे. तर सलीम खान देखील गडगंज पैसा कमावतात.
रिपोर्टनुसार, खान कुटुंबियांच्या पन्नास टक्के मालमत्तेचा सलमान खान एकमेव मालक आहे… भाईजानची एकून संपत्ती 2000 कोटी रुपये आहे… सलमान खान याच्या एकून संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याकडे 2916 कोटींची संपत्ती आहे. तर अरबाज खानची एकूण संपत्ती 500 कोटी रुपये आहे. सोहेल खानची एकूण संपत्ती 333 कोटी रुपये आहे. दोघांच्या संपत्तीपेक्षा सलीम खान यांची संपत्ती अधिक आहे. त्यांच्याकडे 1000 कोटींची संपत्ती आहे. खान कुटुंबियांकडे रिपोर्टनुसार, 5259 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
सलीम खान यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी पहिलं लग्न हिंदू मुलगी सुशीला चरक यांच्यासोबत केलं. लग्नांतर सुशीला चरक यांनी स्वतःचं नाव बदललं आणि त्या सलमा खान झाल्या. लग्नानंतर सलमा आणि सलीम यांनी तीन मुलं आणि एका मुलीचं जगात स्वागत केलं.
त्यानंतर सलीम खान यांनी दुसरं लग्न अभिनेत्री हेलन यांच्यासोबत केलं. सलीम यांच्या दुसऱ्या लग्नानंतर खान कुटुंबात मोठं वादळ आलं. पण हेलन यांनी सलीम खान यांना कधीच त्यांच्या पहिल्या कुटुंबापासून विभक्त केलं नाही. त्यांनी मुलं देखील जन्माला घातलं नाही. त्यांनी अर्पिता खान हिला दत्तक घेतलं. आज सलीम खान यांचे दोन्ही कुटुंब एकत्र एका घरात राहातात. खान कुटुंबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
Leave a Reply