उत्तर प्रदेशमधील वाराणसी विमानतळावर एक चिंताजनक गोळीबाराची घटना घडली आहे. सुरक्षा तपासणी सुरू असताना एका प्रवाशाच्या पिस्तूलमधून अचानक गोळी सुटली, ज्यामुळे एका महिलेसह दोन जण जखमी झाले. ही घटना अनपेक्षितपणे घडल्याने विमानतळावर काही काळ खळबळ उडाली होती. गोळीबारानंतर तात्काळ जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिक माहिती उपलब्ध नाही, परंतु […]
Video : पाकिस्तानच्या युट्यूबरने भारताचा तिरंगा जाळायला सांगितलं, लायटर दिलं आणि भलतंच घडलं; व्हिडीओ एकदा पाहाच!
भारत आणि पाकिस्तानी या दोन शेजारी राष्ट्रांचा स्वातंत्र्य दिन कालपरवा साजरे झाले. दोन्ही देशांच्या फाळणीच्या जखमा आजही भरलेल्या नाहीत. पाकिस्तान १४ ऑगस्ट रोजी त्यांचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. तर भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दोन्ही शेजारील देशात नुकतेच पहलगाम हल्ल्यावरुन ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सैन्य चकमक नुकतीच झाली आहे. या दोन्ही […]
उपचार अर्धवट सोडून जरांगे पाटील तडकाफडकी अंतरवालीला पोहोचले, आज पुन्हा मोठी घोषणा करणार? बैठक बोलावली, नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आता मनोज जरांगे पाटील हे आता पुन्हा एकदा रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये आरक्षण अभ्यासकाची बैठक बोलावली आहे, ही बैठक झाल्यानंतर […]
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत…
वादग्रस्त जाहिरातीमुळे अडचणीत आलेले बांधकाम व्यावसायिक (ब्रोकर) भावेश कावरे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सव्वा बारा ते साडेबाराच्या दरम्यान ही भेट शिवतीर्थावर होणार आहे. ताडदेव येथील एका घराच्या जाहिरातीत भावेश कावरे यांनी मांसाहार करणाऱ्यांना घर मिळणार नसल्याचे म्हटले होते. या जाहिरातीमुळे ते चांगलेच टीकेचे धनी ठरले. या जाहिरातीनंतर राज्यातून आणि समाजमाध्यमांवरून […]
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्… पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
नवी मुंबईत अलीकडेच मोठी घटना घडली आहे. नवी मुंबईमधील एका पीडित व्यक्तीने 112 या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केला. या नंबवर कॉल केल्याने पोलिसांनीच मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीडित व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, त्याला मारहाण झाली होती आणि मदतीसाठी त्याने 112 या हेल्पलाइन नंबरवर […]
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा… भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम जागतिक युद्धामुळे रखडले असून, डांबराच्या तुटवड्याचा फटका त्याला बसला आहे, असा दावा माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. डांबर आता दुसरीकडूनच आणावे लागत असून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वारंवार युद्धनीतीमुळेच कामं रखडलीत असं त्यांनी सांगितलं. पुढे, “यांच्यासारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही” असे मिश्किल वक्तव्य त्यांनी […]