केंद्र सरकारने देशातील स्वयंपाकाच्या गॅस म्हणजेच LPG सिलिंडरबाबत मोठे निर्देश जारी केले आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना LPG सिलिंडरऐवजी पाइपलाइनद्वारे पुरवठा होणाऱ्या नॅचरल गॅस म्हणजेच PNGच्या वापराला वेगाने प्रोत्साहन देण्याचे निर्देश दिले आहेत. यामागील उद्देश LPGवरील अवलंबित्व कमी करून गॅस पुरवठा व्यवस्था अधिक सुरक्षित आणि डिजिटल करणे हा असल्याचे सरकारने स्पष्ट केले […]
दरमहा भरता, तरी नाही येत सांगता? EMI चा फुलफॉर्म काय? अर्थ समजून घेतला तर CIBIL खराब नाही होणार
नवीन घर खरेदी, कार, महागडा स्मार्टफोन वा इतर मोठ्या वस्तूच्या खरेदीसाठी EMI चा पर्याय पहिला असतो. दरमहा आपल्या बँक खात्यातून हप्त्याची रक्कम कपात होते. तरीही अनेकांना ईएमआयचा फुलफॉर्म माहिती नाही. त्याचे गणितही आपण कधी खोलात जाऊन माहिती करून घेत नाही. व्याजाचा टक्का तितका आपण पाहतो. EMI चा फुल फॉर्म Equated Monthly Installment असा आहे. म्हणजे […]
साखरेच्या किंमतीत प्रचंड वाढ, आता सर्वसामान्यांना चांगला पर्याय कोणता? मध की खजूर?
देशात साखरेच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. सणासुदीआधीच साखरेच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. अवकाळी पावसामुळे ऊसाच्या पिकाचं नुकसान झाल्याने दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. साखर महागल्याने बाजारात चहाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. आता सर्वसामान्यांना पर्याय म्हणून साखरेऐवजी गूळ, मध आणि खजूराचा पर्याय योग्य ठरू शकतो. या तिन्ही पर्यायाविषयी जाणून घ्या गूळ : साखरेपेक्षा गुळावर […]
मोठी बातमी! तुकराम मुंढे अडचणीत? समस्त व्यापारी एकवटले; आता भेट थेट कोर्टात; वाद काय?
गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत आहेत. महाराष्ट्रात सुट्टे खाद्यतेल विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने घातलेल्या बंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी आक्रमक झाले आहेत. या निर्णयावर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाची महत्त्वाची बैठक रविवारी नाशिकमध्ये पार पडली. या बैठकीला राज्यातील विविध भागांतून खाद्यतेल […]
Khavdya Dongar Case : मृत्युआधी संगीता चांदगुडे यांचे हादरवणारे आरोप, नणंद नेहमी…तो व्हिडीओ समोर आल्याने खळबळ!
Khavdya Dongar Case : छत्रपती संभाजीनगरात खवड्या डोंगरावरून उडी मारल्याने संपूर्ण चांदगुडे कुटुंब संपून गेले. वडील आणि मुलामध्ये वाद असल्याने या वादाचा शेवट मृत्यूवर झाला. या घटनेचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयफोनच्या हप्त्यांमुळे कुणाल त्याच्या वडिलांसोबत वाद घालत होता, असे सांगितले जात होते. परंतु नंतर मात्र या घटनेला कौटुंबिक वादाची किनार आहे, […]
33 वर्षांपूर्वीची मालिका, हिट होताच प्रत्येक कलाकाराला दिलेली मारूती कार, मालिकेत होते 73 कलाकार
दूरदर्शनच्या सुवर्णकाळात गाजलेल्या मालिकांमध्ये ‘देख भाई देख’ या मालिकेचे नाव आवर्जून घेतले जाते. 1993 मध्ये सुरू झालेली ही मालिका 1994 पर्यंत प्रसारित झाली आणि दीवान कुटुंबातील तीन पिढ्यांच्या गमती-जमतींनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या मालिकेला IMDb वर 8.6 असे रेटिंग मिळाले आहे. ‘देख भाई देख’चे दिग्दर्शन आनंद महेंद्रू यांनी केले होते. त्यांनी अभिनेत्री जया बच्चन […]