‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेत ‘सोनू’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री निधी भानुशाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच पापाराझींनी निधीला स्पॉट केले. यावेळी ती पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. त्यावर तिने गुलाबी रंगाचा लहरिया दुपट्टा घेतला होता. पांढऱ्या स्लिपर्स, मोकळे केस आणि नोजरिंग असा तिचा साधा लूक होता. विशेष म्हणजे निधीने कोणताही […]
E20 Petrol: सरकारचा एक निर्णय अन् दुचाकी चालवणाऱ्या लोकांना मोठा दिलासा, आता E20 पेट्रोलवर काढला नवीन पर्याय
भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी जुन्या वाहनांसाठी E10 सारखे कमी इथेनॉल असलेले मिश्रित इंधन पुन्हा सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्यांनी सांगितले की, भारतात अंदाजे 75-80 दशलक्ष जुन्या दुचाकी आहेत, ज्यांची इंजिने आणि सील्स E20 शी सुसंगत नाहीत. रेट्रोफिटिंग ही एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. अन्न विरुद्ध इंधन या मुद्द्यावर […]
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
मीरा-भाईंदरमधील गोल्डन नेस्ट परिसरात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. स्लॅब कोसळण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी एक स्कूल बस घटनास्थळावरून पुढे गेल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी एमएमआरडीएकडून कंत्राटदारांवर एकूण 12 कोटी 5 लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मुख्य कंत्राटदार जे. कुमार यांना 10 कोटी, फिनिशिंग कंत्राटदाराला […]
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध आणि दूषित पाण्याची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सीलबंद बॉटलमध्ये दूषित पाणी आढळल्याचा दावा ग्राहकांकडून करण्यात आला असून, संबंधित बॉटलवर एक्सपायरी डेट नसल्याचाही आरोप आहे. शुद्ध आणि सुरक्षित पाण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची […]
उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते..; प्रसाद ओकने सांगितला तो खास प्रसंग
‘धर्मवीर: मुक्काम पोष्ट ठाणे’ हा अभिनेता प्रसाद ओकच्या करिअरमधील अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला. यामध्ये त्याने धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारली. या चित्रपटानिमित्त त्याने काही राजकीय व्यक्तिमत्त्वांसोबत भेटीगाठी केल्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रसाद ओक या चित्रपटाविषयी आणि राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “उद्धव ठाकरे हे माझ्या खूप जवळचे आहेत आणि एकनाथ शिंदेही […]
Ladki Bahin Installment: यंदा 1500 नाही तर 1750 रुपये मिळणार, सरकारकडून रक्षाबंधनची बहिणींना खास ओवाळणी
Laadki Bahin Yojana: दर महिन्याला लाडकी बहिणीचे पैसै महिलांच्या खात्यात जमा होतात, काहीवेळाला एखादा हप्ता जमा व्हायचा राहून जातो असा आरोपही बऱ्याचदा अनेक महिलांनी केला आहे. तर अनेक महिलांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा झाले आहेत. आता या महिन्यात रक्षाबंधनाच्या वेळी दोन महिन्याचे पैसे एकत्र येणार आहेत. पण महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशच्या महिलांचा जास्त फायदा होणार आहे. […]