राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. पक्षाचे […]
37 वर्षांपूर्वीचे कुमार सानूचे गाणे, अनुराधा पौडवालांनी दिली साथ.. ऐकताच आजही हृदयाची धडधड वाढते, प्रेमींचे आहे खास
अनुराधा पौडवाल यांनी हिंदी सिनेमात प्लेबॅक सिंगर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक भजनेही गायली, ज्यामुळे त्यांना 'भजन क्वीन' हा टॅग मिळाला. तरीही, अनुराधा यांनी स्वतःला एका जॉनरपुरता मर्यादित ठेवले नाही. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, जेव्हा त्यांना फक्त भजन गीत गाणारी गायिका म्हणून ओळख मिळाली तेव्हा त्यांना खूप दुःख […]
रेंजर पतीने हॉटेलात गर्लफ्रेंडला नेले, कॉन्स्टेबल पत्नीने टाकली धाड, पुढे काय झाले ?
एका रेंजर असलेल्या पतीला त्याच्या पोलीस कॉन्स्टेबल असलेल्या पत्नीने एका हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत रेड हँण्ड पकडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या रेंजर असलेल्या पतीने आलिशान हॉटेलात रुम बुक केली होती. त्यानंतर त्या रेंजरने आपले आधारकार्ड काऊंटरवर जमा केले आणि स्वत:चे नाव देखील नोंदवले. परंतू त्याने सोबत असलेल्या गर्लफ्रेंडचे नाव रजिस्टरमध्ये नोंदवले नसल्याचा आरोप होत […]
Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टींपासून दूरच रहा, अन्यथा घर होईल उद्ध्वस्त
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या जगात वावरत असताना तुम्हाला तुमचं प्रत्येक पाऊल हे खूप काळजीपूर्वक टाकावं लागतं. जर तुमचं एखादं पाऊल जरी वाकडं […]
Railway Blanket : रेल्वेतून ब्लँकेट घरी नेण्याची चूक कधीच करू नका, पोलीस शोध घेऊन…कायद्यात नेमकी शिक्षा काय?
प्रवाशांना आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वे खात्याकडून वेगवेगळ्या स्वरुपाची काळजी घेतली जाते. जे प्रवासी रेल्वेच्या एसी कोचमधून प्रवास करतात त्यांच्यासाठी तर विशेष सुविधा असतात. स्लीपर एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून रेल्वे विभागाकडून अंगावर घेण्यासाठी तसेच सिटवर पांघरण्यासाठी ब्लँकेट दिली जाते. परंतु अनेक प्रवासी हे ब्लँकेट चोरून घरी घेऊन […]
FIFA World Cup 2030 : 2030 फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये दिसू शकते भारताची टीम, टुर्नामेंटच्या फॉर्मेटमध्ये बदलाचे संकेत
फुटबॉल फॅन्ससाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी संकेत दिलेत की, 2030 मध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कपमध्ये टीम्सची संख्या वाढवली जाऊ शकते. ही संख्या 64 केली जाऊ शकते. खरचं असा निर्णय झाला तर भारतासारख्या उदयोन्मुख संघांचं फुटबॉल वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न साकार होण्याची शक्यता वाढेल. (PHOTO CREDIT- PTI) फिफा वर्ल्ड […]