• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून दहशतवाद्याच्या मुलीला अटक, पाकिस्तान कनेक्शन उघड

September 12, 2026 by admin Leave a Comment


ठाणे एटीएसने सर्वात मोठी कारवाई केली आहे. एटीएसने फरार इंडियन मुजाहिद्दिनच्या तारिक खानच्या मुलीला अटक केली आहे. एटीएसने मुंब्र्यातून ही अटक केली आहे. 21 वर्षांच्या मुलीवरील कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बनावट पासपोर्ट आधारे सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये प्रवास केल्याचा संशय आहे. आता एटीएसकडून तिच्या फरार आईचा शोध सुरू आहे.

⁠नमिरा तारीक खान असे अटक केलेल्या २१ वर्षीय तरुणीचे नाव आहे. ⁠नमिरा खान ही दोन वेळा बनावट पासपोर्ट आधारे सौदी अरेबिया येथे जाऊन आली. तिने खोट्या माहितीच्या आधारे पासपोर्ट मिळवले होते. नमिरा ही कुर्ला आणि लखनौच्या पत्तावरुन काढलेल्या बनावट पासपोर्टच्या आधारे सौदी अरेबियामध्ये जाऊन दहशतवादी वडिलांना भेटून आली होती. ⁠तारिक खानची पत्नी शबनम उर्फ फिर्दोष तारिक खान देखील फरार असल्याची माहिती मिळत आहे. आता ⁠तपास यंत्रणा शबनम खानचा शोध घेत आहेत. ⁠नमिरा आणि तिची आई मुंब्र्यात काही दिवस वास्तव्यास होते. ⁠तारीकवर प्रतिबंधित संघटना सिमी, इंडियन मुज्जाहिद्दिन, बनावट नोटा, दहशतवादी कृत्य, देश विरोधी कृत्य असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ⁠तारिक गेल्या अनेक वर्षांपासून फरार आहे.

कोण आहे तारिक खान?

फरार दहशतवादी तारिक खान हा इंडियन मुजाहिद्दीनमधील रियाज भटकल,यासीन भटकलचा जवळचा सहकारी मानलं जायचं. तारिकने त्याच्या संपर्कातील अनेक तरुणांना पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ट्रेनिंग कँपमध्ये पाठवलं आहे. तो 2006 साली भारत-नेपाळच्या सीमेवर इंडियन मुजाहिद्दीनच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सक्रिय होता. तिथेही अनेक तरुणांना ट्रेनिंगला पाठवण्याचा आरोप आहे. पुढे 2007 साली पुण्याच्या कोंढव्यात इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित अनेक संशयित दहशतवाद्यांना लपवल्याचा आरोप आहे. त्यावेळी तो देखील तिथेच होता. त्याने अनेक तरुणांना मोबाईलवरून ट्रेनिंग द्यायचा. सध्या नमिराला एटीएसने अटक केली आहे. नमिराचा शोध सुरू केल्यानंतर तिची आई शबनम फरार झाली. एटीएस आता शबनमच्या मागावर आहेत. तिनेही काही दिवसांपूर्वी पासपोर्टचे नुतनीकरण केल्याची माहिती मिळतेय.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Brics Summit 2026 : जिनपिंग यांनी भारतात पाऊल ठेवण्याआधीच चीनकडून खूप मोठं, अपेक्षा वाढवणारं पॉझिटिव्ह वक्तव्य
  • ATS ची सर्वात मोठी कारवाई; मुंब्र्यातून दहशतवाद्याच्या मुलीला अटक, पाकिस्तान कनेक्शन उघड
  • रिटायरमेंटच्या 5 दिवस आधी IAS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
  • मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात…
  • Nitin Gadkari: बेरोजगारी आणि गरिबी ही देशासमोरील मोठी आव्हानं, नितीन गडकरी यांचा सरकारला घराच आहेर, म्हणाले काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in