
लडाखचे पर्यायवरणवादी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांना मोठे आवाहन केले आहे. ते नवीन लढा सुरू करत आहेत. जंतरमंतरवरील आंदोलनाच्या आणाभाका देत त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सोनम वांगचुक यांनी नवीन लढा उभारला आहे. त्याला अभिजीत दिपके यांच्यासह सीजेपीने पाठिंबा देण्याचे आवाहन वांगचुक यांनी केले आहे. लडाखच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वांगचुक यांनी यापूर्वी प्रदीर्घ उपोषण केले होते. तर आता ते पदयात्रा काढणार आहेत. पण अभिजीत दिपके हे या पदयात्रेत सहभागी होतील की नाही याविषयी संभ्रम आहे.
वांगचुक यांना हवा पाठिंबा
लडाखचा हा लढा केवळ या क्षेत्रापुरता मर्यादित नाही. तो पर्यावरण आणि लोकशाही हक्क रक्षणासाठी असल्याचे वांगचुक म्हणाले. जंतरमंतरवरील सीजीपेच्या आंदोलनात वांगचुक यांनी 26 दिवसांचे दीर्घकालीन आमरण उपोषण केले होते. त्याची आठवण करून देत आता लडाखमधील आंदोलनाला वांगचुक यांनी पाठिंबा देण्याचे आवाहन सीजेपी आणि दिपके यांना केले आहे.
अभिजीत दिपके म्हणाले काय?
CJP चे अभिजीत दिपके यांनी थोडं उशीराच या आवाहनावर प्रतिक्रिया दिली आहे. दिपके हे सध्या महाराष्ट्रातील आंदोलनात गुंतलेले आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलनात ते दिसले. शाळा मोहिमेत ही ते दिसले. इतकेच नाही तर काल मराठा समाजाच्या आंतरवाली सराटीतील आंदोलनातही त्यांनी हजेरी लावली. त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. तर वांगचुक यांच्या आंदोलनात सहभागी होण्याच्या आवाहनावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. वांगचुक यांच्या उपोषणाचा आणि संघर्षाचा आदर करतो. जेव्हा जेव्हा नागरिक अथवा विद्यार्थ्यांच्या मूलभूत हक्कांचा प्रश्न येतो, तेव्हा अहिंसक आणि शांततापूर्ण मार्गाने दिलेला लढाच व्यवस्थेविरोधात महत्त्वाचा ठरतो असे दिपके म्हणाले.
Stand with Ladakh! https://t.co/6buspllZtf
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) September 12, 2026
राज्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न असोत की लडाखमधील स्थानिकांचे अधिकार असोत, प्रशासकीय उदासीनतेविरोधात उभ्या ठाकणाऱ्या रास्त आंदोलनाला जनतेचा पांठिबा मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पण दिपके या आंदोलनात सहभागी होतील की नाही, याविषयी त्यांनी काहीच भाष्य केले नाही. ते पदयात्रेत वांगचुक यांच्यासोबत सहभागी होतील की नाही यावर ते लवकरच भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
Leave a Reply