
अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे ही जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांकडून नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो.
आता अमृताने प्रसादसोबत शेअर केलेल्या खास रेट्रो फोटोमुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अमृताने प्रसादसोबतचे 80 च्या दशकातील रेट्रो अंदाजातील काही रोमँटिक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये दोघांचा विंटेज आणि क्लासिक लूक पाहायला मिळत असून, त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘80 च्या दशकाचा रेट्रो ट्रेंड’ मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आपले फोटो जुन्या काळातील विंटेज किंवा क्लासिक अंदाजात बदलण्याचा ट्रेंड नेटकऱ्यांमध्ये चांगलाच गाजतोय.
जुन्या काळातील फॅशन, हेअरस्टाइल, कपड्यांची शैली आणि पारंपरिक फोटोग्राफीचा टच यामुळे आजच्या काळातील व्यक्तींना थेट चार दशकांपूर्वीच्या काळात पाहण्याचा अनुभव मिळत आहे.




Leave a Reply