• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

6 वर्ष मोठ्या मुस्लिम अभिनेत्रीसोबत लग्न, 21 वर्ष लहान महिला खासदारासोबत अफेअर, अभिनेत्याचं वादग्रस्त आयुष्य

September 12, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये 80 आणि 90 च्या दशकात अनेक सेलिब्रिटी त्यांच्या गुड लूक्स आणि दमदार पर्सनालिटीमुळे चर्चेत आणि चाहत्यांच्या मनावर त्यांनी राज्य केलं. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे, आदित्य पंचोली… आदित्य पंचोली त्याच्या कामामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला. आदित्य याने दुसऱ्या धर्मातील मुलीसोबत लग्न केलं. लग्न झालेलं असताना अभिनेत्याचा जीव अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांच्यावर जडला. आदित्य आणि कंगना यांच्या नात्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. आदित्य पांचोली केवळ चर्चेतच राहिला नाहीत, तर विवाहबाह्य संबंध आणि इतर मुद्द्यांमुळे तो वादांच्या भोवऱ्यातही सापडला. तरीही, त्या काळातही त्याला मुस्लिम पत्नीची साथ लाभली.

मुस्लिम अभिनेत्री जरीना वहाबशी लग्न…

आदित्यच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर, तो प्रसिद्ध मुस्लिम अभिनेत्री झरीना वहाबच्या प्रेमात पडला; ती त्याच्यापेक्षा वयाने सुमारे सहा वर्षांनी मोठी होती. एका सिनेमाच्या सेटवर त्यांच्यातील प्रेमसंबंध बहरले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ज्या वर्षी आदित्य पांचोलीने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं, त्याच वर्षी त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील एका नवीन पर्वाचीही सुरुवात केली; 1986 मध्ये आदित्यने सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या झरीनाशी विवाह केला. त्यानंतर, दोघांनी सूरज पांचोली आणि सना पांचोली यांचं जगात स्वागत केलं.

21 वर्षांनी लहान कंगनासोबत प्रेमसंबंध आणि मारहाणीचे आरोप

विवाहित आणि दोन मुलांचा वडील असूनही, आदित्य पांचोलीने आपल्यापेक्षा 21 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री कंगना राणौतसोबत प्रेमसंबंध सुरू केले. विशेष म्हणजे, हे नातं तेव्हा सुरू झालं जेव्हा कंगना बॉलिवूडमध्ये पूर्णपणे नवीन होत्या आणि कामाच्या शोधात होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. कंगना आणि आदित्य त्यांच्या आयुष्यात पुढे गेले.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आदित्य आणि कंगना यांचं ब्रेकअप झालं. पण 2017 मध्ये दोघांच्या नात्याच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या. त्या वेळी, कंगना यांनी आदित्यवर त्यांच्या नातेसंबंधादरम्यान शारीरिक अत्याचार केल्याचा आणि तिला घरात कोंडून ठेवल्याचा आरोप केला होता. मात्र, आदित्यने हे आरोप निराधार असल्याचं सांगून फेटाळून लावलं आणि त्या अभिनेत्रीवर आपला आर्थिक व भावनिक गैरफायदा घेतल्याचा आरोप केला.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • वल्लरी विराजनंतर राकेश बापटसोबत झळकणार ही लोकप्रिय अभिनेत्री
  • Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनापूर्वी मोठी खलबतं, फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात बैठक, तोडगा निघणार?
  • मेलेलं मढं उकरून काढण्याचा प्रयत्न, दिशा सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याची प्रतिक्रिया
  • Rohit Pawar: MPSC चे अध्यक्ष तुमचे मित्र असतील तर, फडणवीस तुम्ही त्यांचं…रोहित पवारांच्या मागणीची चर्चा
  • 6 वर्ष मोठ्या मुस्लिम अभिनेत्रीसोबत लग्न, 21 वर्ष लहान महिला खासदारासोबत अफेअर, अभिनेत्याचं वादग्रस्त आयुष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in