• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

6 खासदारांच्या फुटीनंतर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, 40 लोकसभा मतदार संघात..

September 10, 2026 by admin Leave a Comment


शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. ठाकरे गटातून त्यांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. हा ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे. त्यातच शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सध्या कोर्टात सुरू आहे. ठाकरेंनी बाजू मांडली. त्यानंतर आता शिंदेंकडून कोर्टात बाजू मांडली जात आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला. आगामी 2029 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरेंच्या सेनेकडून मुंबईतील अनेक तरुणांना लोकसभा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी निश्चित करण्यात आली. मुंबईतील आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेतून लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली. ठाकरेंच्या सेनेकडून आगामी 2029 च्या निवडणुकीच्या तयारीला सुरवात करण्यात आली.

मुंबईतील 6 लोकसभा मतदार संघ, ठाणे आणि जळगाव वगळता इतर लोकसभा मतदार संघात पक्षाकडून जबाबदारी निश्चित करण्यात आली. शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख कल्याण आणि भिवंडी – वरुण सरदेसाई, शिर्डी – अहिल्यानगर -सुनील शिंदे, सातारा आणि सांगली – नितीन बानुगडे-पाटील,  छत्रपती संभाजीनगर – आशीष चेंबुरकर, शिरूर लोकसभा – किरण तावडे.

पुणे जिल्हा – सचिन पडवळ, सोलापूर आणि माढा – सुषमा अंधारे, नाशिक आणि दिंडोरी – रविंद्र मिर्लेकर, बुलढाणा – नितीन देशमुख / नरेंद्र खेडेकर, अकोला – नितीन देशमुख / नीलेश घुमाळ, अमरावती – नितीन देशमुख / डॉ. किशोर ठाकरे, हिंगोली – बबनराव थोरात, कोल्हापूर – अरुण दुधवडकर, बारामती – संजय सावंत, धुळे – अशोक धात्रक, रावेर – गुलाबराव वाघ.

नंदुरबार – मुकेश साळुंके, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – प्रदीप बोरिकर, रायगड – संजय मानाजी कदम – (पेण विधानसभा वगळून), मावळ – प्रसाद भोईर (पेण विधानसभा सहित), पालघर – विलास पोतनीस, सातारा – उदय ढळवी, सांगली – स्वप्नील कुंजीर, हातकणंगले – महेंद्र इंदुलकर, जालना – सुनील वामन पाटील, धाराशिव – सुनील काटमोरे, नांदेड – किशोर पोतदार.

परभणी – प्रदीपकुमार खोपडे, लातूर – परमेश्वर सातपुते, बीड – अशोक सकपाळ, यवतमाळ-वाशिम – दिलीप जाधव, वर्धा – सुधीर सूर्यवंशी, नागपूर – सतीश हर्डे, रामटेक – सुरेश सावंत, गडचिरोली-चिमूर – महेश केदारी, चंद्रपूर – प्रशांत कदम, भंडारा-गोंदिया – राजू पाटील नावे ठाकरेंच्या सेनेकडून जाहीर करण्यात आली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अण्णा हजारे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृती स्थिर
  • सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर लेकीचं सडेतोड उत्तर; म्हणाली ‘काहींना इतरांचा आनंद..’
  • मुंबईनंतर दिल्लीचं महत्व संपवण्याचा खटाटोप; राज ठाकरेंचा मोदी सरकारवर पुरावा देत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
  • Vijay Mallya: आता झुरळ होऊ का? विजय माल्या यांना का व्हायचंय कॉक्रोच? पळपुटा म्हटल्यानं का झोंबल्या मिरच्या?
  • अभिजीत दीपके देणार महाराष्ट्र सरकारला टेन्शन, पुण्यात येताच सर्वात मोठी घोषणा; आता MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in