• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

55 वर्षांपूर्वी या व्यक्तीला पाहण्यासाठी मुलं बघायची रविवारची वाट, इतकी क्रेझ की आता OTT पाहण्यासाठी गर्दी

September 10, 2026 by admin Leave a Comment


भारतीय कॉमिक्सच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय आणि बुद्धिमान पात्रांपैकी एक असलेल्या ‘चाचा चौधरी’ला यंदा 55 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1971 मध्ये हिंदीतील ‘लोटपोट’ या मासिकातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या पात्राने तब्बल पाच दशकांहून अधिक काळ अनेक पिढ्यांचं मनोरंजन केलं. लाल पगडी, पांढऱ्या मिशा, हातात काठी आणि खिशात बदाम असलेली चाचा चौधरींची प्रतिमा आजही अनेकांच्या बालपणीच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहे.

‘चाचा चौधरी’ हे लोकप्रिय पात्र प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्राण कुमार शर्मा यांनी साकारलं. 15 ऑगस्ट 1938 रोजी कसूर येथे जन्मलेल्या प्राण यांना पुढे ‘भारताचे वॉल्ट डिस्ने’ असंही म्हटलं गेलं. चाचा चौधरी हे पात्र तयार करताना त्यांना चाणक्य आणि गावातील बुद्धिमान ज्येष्ठ व्यक्तींपासून प्रेरणा मिळाली.

चाचा चौधरी हे इतर सुपरहिरोंपेक्षा वेगळे होते. ते ना हवेत उडायचे, ना त्यांच्याकडे कोणतंही आधुनिक गॅजेट होतं. त्यांची खरी ताकद होती त्यांची बुद्धी आणि प्रसंगावधान. म्हणूनच ‘चाचा चौधरी का दिमाग कंप्यूटर से भी तेज चलता है’ ही ओळ आजही लोकप्रिय आहे. प्राण यांचं 6 ऑगस्ट 2014 रोजी निधन झालं. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

या जोडीसोबत चाची बीनी आणि विश्वासू कुत्रा रॉकेट ही पात्रंही मुलांच्या मनात घर करून गेली. अचरजगंजमध्ये घडणाऱ्या विविध घटना, चोर, ठग, भ्रष्ट अधिकारी आणि अनेकदा एलियनसारख्या संकटांचा सामना हे पात्रं मिळून करत असत.

80-90 च्या दशकातील रविवार म्हणजे ‘चाचा चौधरी’

‘डायमंड कॉमिक्स’ने चाचा चौधरींच्या कथा देशभर पोहोचवल्या. हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये या कॉमिक्सची मोठी मागणी होती. रेल्वे स्टेशन, बस स्थानकांपासून छोट्या दुकानांपर्यंत चाचा चौधरींच्या कॉमिक्स सहज उपलब्ध असायच्या.

80 आणि 90 च्या दशकातील अनेक मुलांसाठी रविवार म्हणजे चाचा चौधरीच्या गोष्टी वाचण्याचा आणि ऐकण्याचा दिवस. त्या काळात विविध भारतीवर रविवारी दुपारी डायमंड कॉमिक्सशी संबंधित कार्यक्रमही प्रसारित होत असे. त्यामुळे नवीन कॉमिक्सची माहिती आणि कथांचे काही भाग ऐकण्याची उत्सुकता मुलांमध्ये असायची. आता या अॅनिमेटेड कथा डिजिटल प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहेत. त्यामुळे चाचा चौधरी, साबू आणि रॉकेटची ओळख नव्या पिढीतील मुलांनाही होत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
  • Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले…
  • ‘बानू’च्या जांभळ्या साडीमधील सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड, फोटो पाहून सर्वच थक्क
  • Brics Summit : आधी ताटकळत ठेवलं, आता अखेरच्या क्षणी चिनी राष्ट्रपती जिनपिंग यांनी भारत दौऱ्याबद्दल घेतला निर्णय
  • शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in