• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

24 तास सलग गाण्याचं शूटिंग अन् सेटवरच बेशुद्ध झालेली ही अभिनेत्री; सनी देओलने सावरलं, नेमकं काय घडलं होतं?

September 11, 2026 by admin Leave a Comment


90 च्या दशकात चित्रपटांच्या शूटिंगची पद्धत आजच्या तुलनेत खूपच वेगळी होती. आज कलाकारांसाठी व्हॅनिटी व्हॅन, आरामदायी सेट आणि विविध सुविधा सहज उपलब्ध असतात. मात्र, त्या काळात कलाकारांना मर्यादित सोयी-सुविधांमध्येच तासन्‌तास शूटिंग करावं लागायचं. अनेकदा कलाकारांना सतत काम करत राहावं लागायचं. अशाच एका कठीण शूटिंगचा अनुभव अभिनेत्री नीलम यांना आला होता.

अभिनेत्री नीलम यांनी 90 च्या दशकात आपल्या साध्या आणि मनमोहक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. चंकी पांडे यांच्यासोबत त्यांची जोडी चांगलीच गाजली. त्याचबरोबर सनी देओल यांच्यासोबतही त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, सनी देओलसोबतच्या एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नीलम यांची अशी अवस्था झाली होती की, त्या थेट सेटवरच बेशुद्ध पडल्या.

‘पाप की दुनिया’मधील गाण्याच्या शूटिंगदरम्यान घडला प्रकार

नीलम आणि सनी देओल यांनी 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पाप की दुनिया’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील ‘चोरी-चोरी यूं जब हो’ हे गाणं विशेष गाजलं. आजही हे गाणं जुन्या हिंदी चित्रपटांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.

याच गाण्याच्या शूटिंगदरम्यान नीलम यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. एका रिअॅलिटी शोमध्ये नीलम यांनी स्वतः या प्रसंगाचा खुलासा केला होता.

सलग 24 तास शूटिंग, अखेर नीलम बेशुद्ध

नीलम यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दिवसभर आणि त्यानंतर संपूर्ण रात्र गाण्याचं शूटिंग केलं. विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. पहाटे चार वाजेपर्यंत शूटिंग सुरू राहिल्याने त्यांच्या शरीराने अखेर साथ सोडली.

प्रचंड थकवा आणि सततच्या शूटिंगमुळे नीलम यांना चक्कर आली आणि त्या सेटवरच बेशुद्ध पडल्या. त्या इतक्या थकल्या होत्या की, त्यांना स्वतःला सावरताही येत नव्हतं. त्यावेळी सनी देओल यांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला.

नीलम यांनी हा किस्सा सांगताना त्या दिवसांची आठवण करून दिली होती. शूटिंग पूर्ण करण्यासाठी कलाकार किती कठीण परिस्थितीत काम करायचे, याची कल्पना या प्रसंगावरून येते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रात्री 4 हत्या… सकाळी वडिलांना चहा पाजला, त्यानंतर… राहुलने नेमकं काय केलं?
  • 149 रुपयांची ही वस्तू खरेदी करण्यासाठी डिमार्टमध्ये नागरिकांची गर्दी, एक ग्राहक तब्बल..
  • Elena Rybakina: वडिलांनी कार विकली, मुलीने देशाशी नातं तोडलं! आता एक सामना जिंकताच मिळणार 53 कोटी
  • EV मार्केटमध्ये ‘टाटा’चा धमाका! विकली जाणारी दर चौथी कार इलेक्ट्रिक, विक्रीचे आकडे पाहून सगळेच थक्क!
  • महाराष्ट्राची क्रश, शिवालीच्या नवीन लुकवर चाहते फिदा, हटके पोज पाहून सर्वच थक्क

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in